Pune Velhe News : वेल्हे येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील लिपीकाला ५० हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झाली आहे. सावकारी लायसन्स मिळवण्यासाठी लागणारा प्रस्ताव तयार करुन देतो, तसेच यासाठी पाठपुरावा करतो, असे म्हणत याकामी संबंधित लिपिकाने तब्बल ५० हजारांची लाच मागितली होती. या लिपिकास ताब्यात घेतल्याची माहिती, वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधंक पथकाने ही कारवाई केली आहे. शुक्रवारी (ता.१६) या लिपिकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी काल रात्री उशीपापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. या लिपिकाचे नाव पंढरीनाथ मच्छिंद्रनाथ तमनर असे असून, याप्रकरणी विलास जगन्नाथ पांगारे यांनी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. (Velhe Bribe News Assistant Registrar Clerk demanded 50 thousand bribe)
वेल्हा पोलीस ठाणे येथे दाखल केले गेलेल्या तक्रारीनुसार, वेल्हे गाव येथे वास्तव्यास असणाऱ्या रहिवासी विलास पांगारे यांना सावकारी परवाना काढायचे होते. या कामी ते २० मे या दिवशी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वेल्हे येथील कार्यालयात गेले. यावेळी लिपीक पंढरीनाथ तमनर यांनी प्रस्ताव तयार करून, जिल्हा निबंधक कार्यालयात पाठपुरावा करून परवाना काढून देवू, यासाठी ३० हजार कार्यालयाला व २० हजार वेगळे असे एकूण ५० हजार लागतील, असे त्यांनी सांगितले.
लिपिकाकडून लाचेची मागणी झाल्यावर फिर्यादी पांगारे यांनी याबाबत, पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. यानुसार एसीबीच्या पथकाने २९ मे रोजी वेल्ह्यात येऊन याबाबत चाचपणी केली असता, पंढरीनाथ तमनर यांनी पन्नास हजार रूपयांची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. तीस हजार रूपये याकामी आणि वीस हजार वैयक्तिक अशी रक्कम त्रयस्थ व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले गेले होते. पडताळणीनंतर पुणे एसीबीने वेल्हे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून, लिपिकास अटक केली.
एसीबी विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे यांच्या निर्देशाखाली पुणे विभागाने पथकाने केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करत आहेत.अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.