देहूतील विजयामुळे पिंपरी राष्ट्रवादीच्या अंगात संचारले १० हत्तीचे बळ आणि केला हा दावा....

पिंपरी चिंचवडमध्ये सत्तापरिवर्तन होईल. शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील, असा दावा केला आहे.
Sanjog Waghere Patil
Sanjog Waghere PatilSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : तीर्थक्षेत्र देहूच्या पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) जोरदार मुंसडी मारत सत्ता कायम राखली, त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष संचारला आहे. त्यातून आगामी महापालिका निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या नेतृत्त्वाखाली पिंपरी चिंचवडमध्ये सत्तापरिवर्तन होईल. शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील, असा दावा पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी देहूतील निकालानंतर बुधवारी (ता. १९ जानेवारी) केला. (The victory in Dehu boosted the confidence of Pimpri Chinchwad NCP)

भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या देहूच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळाली. त्यावर भाजपच्या खोट्या भूलथापा आणि फसव्या घोषणांना देहूनगरीतील मतदारांनी स्पष्ट नकार दिला आहे, त्यामुळे तिथे त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष वाघेरे यांनी दिली आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या निवडणुकीत या ठिकाणच्या मतदारांनी पक्षावर विश्वास दाखवला आहे, असे ते म्हणाले.

Sanjog Waghere Patil
आमदार गोरे गटाचा धुव्वा : दहिवडीत राष्ट्रवादीच्या देशमुखांची जादू चालली!

पुणे जिल्ह्यातील हा मोठा विजय असल्याने पक्षात जल्लोष संचारला आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी झालेल्या या निवडणुकीमुळे फसव्या भाजपला आणि त्यांच्या खोटं बोलणाऱ्या नेत्यांना जनतेने आरसा दाखवला आहे. पिंपरी चिंचवडमध्येही भाजपने पाच वर्षांपूर्वी अशीच खोटी आश्वासने आणि भूलथापा देऊन सत्ता मिळवली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत केवळ प्रचंड भ्रष्टाचार केला. कोणतेही प्रश्न भाजपने तडीस नेले नाहीत, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्येदेखील सत्ता परिवर्तन अटळ आहे, असे ते म्हणाले.

Sanjog Waghere Patil
नगरपंचायतींच्या निकालात दोन रोहितचा बोलबाला!

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी आणि मतदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुन्हा शहराचे नेतृत्व देण्याची तयारी केलेली आहे. पक्षाचे १०० हून अधिक नगरसेवक निवडून येतील आणि पूर्ण बहुमताने राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होईल, असा दावाही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com