Amol Kolhe and Shrirang Barne : बारणे अन् कोल्हेंच्या विजयामुळे कुणाचं टेन्शन वाढलं अन् कोण झालं 'सेफ'?

Loksabha Election 2024 : ...त्यामुळे तेथे दादा भाकरी फिरविणार की ती तशीच ठेवणार याकडे आतापासून लक्ष लागले आहे.
Shrirang Barne and Amol Kolhe
Shrirang Barne and Amol KolheSarkarnama

Maval and Shirur Lojsa लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. शिरुर`मध्ये आघाडीचे डॉ.अमोल कोल्हे हे पुन्हा निवडून आले. तर `मावळ`मध्ये महाय़ुतीचे श्रीरंग बारणे यांची खासदारकीची `हॅटट्रिक झाली. कोल्हेंच्या विजयाने शिरुर`मध्ये आघाडीचे चार मातब्बर आमदार `ड़ेंजर झोन`मध्ये गेले असून दुसरीकडे `मावळ`मधील तेवढेच आमदार तेथे बारणेंनी बाजी मारल्याने `सेफ झाले आहेत. .

`मावळ`चा निकाल हा काहीसा अपेक्षित होता. कारण तेथे दोन टर्म खासदार असलेल्या बारणेंपुढे फक्त नगरसेवकपदाची निवडणूक लढलेल्या आघाडीच्या नवख्या संजोग वाघेरे -पाटील यांचे कमकुवत आव्हान होते. तरीही ते झुंजले पण,अनुभव आणि संपर्काच्या जोरावर बारणेंनी(Shrirang Barne) बाजी मारली. मात्र,`शिरुर`चा निकाल धक्कादायक ठरला.

कारण, तेथे तीन टर्म खासदार असलेले शिंदे शिवसेनेचे उपनेते आणि निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी आपल्या पक्षात घेतलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. तेथे अजित पवारांनी कोल्हेंना पराजित करण्याचे चॅलेंज दिले होते. त्यामुळे तेथील हार त्यांच्या नामुष्कीत बारामतीतील त्यांच्या पत्नी सुनेत्रांच्या पराजयानंतर आणखी भर टाकणारी ठरली.

शिरुरमध्ये अमोल कोल्हेंना(Amol Kolhe) सर्वाधिक 51 हजाराचे लीड हे अजित पवार समर्थक आमदार अतुल बेनकेंच्या जुन्नर मतदारसंघाने दिले.त्यानंतर याच पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या खेडमध्ये ते 46 हजाराचे मिळाले. तर,अजितदादांचेच आमदार चेतन तुपे यांच्या हडपसरने ते 13 हजार आणि राज्यातील कॅबिनेटमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगावने ते 11 हजारांचे दिले. त्यामुळे या मोठ्या मताधिक्याचा विचार करता राष्ट्रवादीचे हे चारही आमदार तूर्तास डेंजर झोनमध्ये गेले आहेत.

येत्या विधानसभेला महायुतीची अवस्था आणखी बिकट होण्याचे संकेत आताच मिळाले आहेत.त्यामुळे तेथे दादा भाकरी फिरविणार की ती तशीच ठेवणार याकडे आतापासून लक्ष लागले आहे.

शरद पवार(Sharad Pawar) समर्थक अशोक पवार यांच्या शिरुरमध्येही कोल्हेंना 28 हजारांचे लीड मिळाले आहे.फक्त भोसरी या भाजप आमदार महेश लांडगेंच्या मतदारसंघात ते नऊ हजाराने पिछाडीवर राहिले. त्यामुळे ते आणि अशोक पवार हे सेफ झाले आहेत. मात्र,कोल्हेंना मोठे लीड दिलेले अजितदादांचे वरील चार आमदार, मात्र डेंजर झोनमध्ये गेले आहेत. त्यांना तिकीट मिळाले, तरी विजय त्यांना सोपा नसणार आहे, हे लोकसभेचा निकाल सांगतो आहे. तर,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची समीकरणे वेगवेगळी असल्याने मोहिते आणि वळसे पुन्हा निवडून येतील,असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

मावळमध्ये महायुतीचा विजय झाल्याने तेथील त्यांच्या पाच आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यात भाजपच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या मतदारसंघाने महायुतीचे विजयी उमेदवार बारणेंना तब्बल 74,765 एवढे घशघशीत लीड दिले. त्यानंतर भाजपचेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेलमध्ये ते 31 हजार 38चे मिळाले.त्यामुळे या दोघांची पुन्हा उमेदवारी जवळपास नक्की झाल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार(Ajit Pawar) राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मतदारसंघात बारणेंना 16 हजार 737, तर याच पक्षाचे आमदार सुनिल शेळकेंच्या मावळमध्ये ते 4 हजार 935 चे मिळाले. परिणामी या दोघांचाही पुन्हा तिकीट मिळण्याचा खुंटा बळकट झाला आहे. भाजप संलग्न अपक्ष आमदार महेश बालदी यांच्या उरणमध्ये 13 हजार 250 चे लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळाले. त्यामुळे ते सुद्धा पुन्हा उमेदवारी मागू शकतात. फक्त कर्जतचे शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात महायुती 17 हजार 607 मतांनी पिछाडीवर राहिली.त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे पुन्हा तिकिट देतील की नाही,याविषयी शंका आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com