Ajit Pawar And Purandar : विजय शिवतारे की संजय जगताप; पुरंदरमधून अजितदादा आता कुणाला आमदार करणार ?

Sanjay Jagtap Vs Vijay Shivtare : विधानसभा निवडणुकीबाबत पुरंदरमध्ये उलट-सुलट चर्चांना उधाण
Vijay Shivtare, Ajit Pawar, Sanjay Jagtap
Vijay Shivtare, Ajit Pawar, Sanjay JagtapSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यांनतर राज्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बिघडली आहेत. यातून मार्ग काढणाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नाकीनऊ येणार असल्याचे बोलले जात आहे. यात 'चॅलेंज' देऊन अजित पवारांनी पराभूत केलेले शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारेंच्या पुरंदर मतदारसंघाचे नाव प्राधान्याने घेतले जाते. (Latest Political News)

गेल्या विधानसभेला अजित पवारांनी ठरवून शिवतारेंना पराभूत केले होते. यामुळे पवार ठरवात ते करूनच दाखवतात, अशी ओळखही निर्माण झाली आहे. दरम्यान, आमच्यात फिट्टमफिट झाल्याचे शिवतारे सांगत असले तरी पवारांना काँग्रेसचे आमदार संजय जगतापांनी आतापर्यंत साथ दिलेली आहे. यामुळे अजितदादा महायुतीचा धर्म पाळणार की जगतापांना अडून मदत करणार, अशी चर्चा होऊ लागली आहे. अजितदादांची जगतापांना मदत झाल्यास शिवतारेंसाठी मुंबई पुन्हा लांबच राहू शकते.

Vijay Shivtare, Ajit Pawar, Sanjay Jagtap
Chandrapur Congress News : कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी हाणून पाडला आमदार धानोरकरांना एकटं पाडण्याचा प्रयत्न!

शिवसेना फुटली आणि राज्यातील ४० आमदार आणि १३ खासादारांसह आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. यात पुरंदचे माजी आमदार विजय शिवतारेंचाही समावेश आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पुरंदरमध्ये येत शिवतारेंना बळ देण्याचेही काम केले. आता राष्ट्रवादीतील अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर जेजुरीत शासन आपल्या दारी कार्यक्राम पार पडला. यावेळी शिवतारेंनी शिंदे-फडणीस-पवारांचे जल्लोषात स्वागत केले. शिवतारे-पवारांची वाढती सलगी पाहून आता पुन्हा पुरंदरच्या जागेबाबत नव्याने चर्चा सुरू झालेली आहे.

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत शिवतारेंनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. यातून अजितदादांनी भरसभेत शिवतारेंना 'बघतच कसा निवडून येतो ते' असा इशाराच दिला होता. पवारांनी लावलेल्या 'फिल्डिंग'मुळे सलग दोनदा आमदार झालेल्या शिवतारेंची २५ हजार मतांनी 'विकेट' घेत काँग्रेसचे जगताप निवडून आले.

Vijay Shivtare, Ajit Pawar, Sanjay Jagtap
Nawab Malik Bail : नवाब मलिक 'असे' सुटले, पण 'तसे' अडकले; काय आहे कारण ?

दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडानंतर काँग्रेसचेही काही आमदार गळाला लागणार असल्याची चर्चा होती. यात संजय जगतापांचेही नाव घेतले जात होते. मुंबईत जगतापांनी अजितदादांची भेट घेतल्याने तर या चर्चेला हवा मिळाली होती.

या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये पुरंदरमधून आमदार होण्यासाठी अजितदादा शिंदे गटाचे विजय शिवतारे की काँग्रेसचे संजय जगताप यातील कुणाला पाठबळ देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com