Vijay Wadettiwar News : कामगार उद्ध्वस्त होत आहेत, नेत्यांना थोडी लाज वाटली पाहिजे; वडेट्टीवार संतप्त...

General Motors News : जनरल मोटर्स दोन वर्षांपूर्वी बंद केल्याने तेथील एक हजार कामगार बेकार झाले आहेत. नऊ दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Maval : "जनरल मोटर्स कंपनी बंद पडल्याने हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड आली असताना राज्यातील नेत्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे. एवढे कामगार उद्ध्वस्त होत आहेत, त्यांचा शाप लागेल," अशा संतप्त भावना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या. वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्या कामगारांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

तळेगाव एमआयडीसी ही विलासराव देशमुख यांनी सर्वांगीण विकासासाठी उभी केली. जनरल मोटर्सला टॅक्समध्ये सवलत देऊन महाराष्ट्रात उद्योगांना चालना मिळावी म्हणून फुकटात जमीन दिली. आता ती कंपनी बंद पडली आहे. हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. याबाबतचे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळात विरोधी पक्षनेते असताना मंत्री सुरेश खाडे यांना दिलं होतं. त्यांनी पत्र पाहिला पाहिजे होत आणि कामगारांच्या भावना जाणून घ्यायला होत्या, पण तसे न करता कंपनीला क्लोजर मंजुरी दिली. सुरेश खाडे हे दुतोंडी सापासारखे आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

Vijay Wadettiwar
Supriya Sule News : सुप्रियाताईंनी केलं पंकजाताईंचं कौतुक; म्हणाल्या, "निवडणुकीच्या वेळी टोकाची भूमिका घेऊ, मात्र...

"सुरेश खाडे यांनी घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला? त्यांना कुणाचा फोन आला? की मलिदा मिळाला हे पाहावं लागणार आहे. विधानसभेत हा प्रश्न आम्ही लावून धरणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

विजय वडेट्टीवार हे तळेगावात साखळी उपोषण करत असलेल्या जनरल मोटर्सच्या कामगारांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आले होते. या वेळी त्यांनी कामगारांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. तळेगाव (ता. मावळ) एमआयडीसीतील जनरल मोटर्स ही कंपनी दोन वर्षांपूर्वी व्यवस्थापनाने बंद केल्याने तेथील एक हजार कामगार बेकार झाले आहेत. नऊ दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे.

Vijay Wadettiwar
Jayant Patil News : राष्ट्रवादी कुणाची? हे शेंबड्या पोराला विचारलं, तरी ते सांगेल...; आयोगाने यात बदल केला तर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com