Chinchwad By-Elelction : कसब्यापेक्षा चिंचवडच्या मतदारांची `नोटा`ला जास्त पसंती...

कसब्यात १६ उमेदवार होते. त्यातील १४ जणांचे डिपॉजिट जप्त झाले.
Chinchwad By-Elelction :
Chinchwad By-Elelction :Sarkarnama

Chinchwad By-Elelction : चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. चिंचवडला मतदानात `नोटा`हा कसब्यापेक्षा दुप्पट वापर झाला. पावणेतीन हजार मतदारांना २८ पैकी कुठलाच उमेदवार पसंत नसल्याचे स्पष्ट आले.

या निवडणुकीत कसब्यापेक्षा चिंचवडला कितीतरी अधिक म्हणजे तब्बल ५९ लाख रुपयांच्या चलनी नोटा प्रचारादरम्यान पकडण्यात आल्या. चिंचवडचे युती,आघाडी आणि एक अपक्ष असे तिन्ही उमेदवार कोट्याधीश असल्याने मोठ्या प्रमाणात खर्च या निवडणुकीत झाला. अचंबा वाटेल एवढे पैसे वाटल्याचा आरोप तिन्ही प्रमुख उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध केला. त्याचप्रकारे `नोटा`हा (none of the above) कसब्यापेक्षा चिंचवडमध्ये अधिक वापरला गेला.

Chinchwad By-Elelction :
Kasaba By Election: पेठांमधल्या १६ नगरसेवकांनी काय केलं? भाजपकडून शोध सुरु...

मतदारांची नाराजी त्यातून स्पष्ट झाली. चिंचवडमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आय़टीयन्स) मतदारांनी हा पर्याय निवडल्याची चर्चा आहे. तिन्ही प्रमुख उमेदवारांच्या कार्यक्षेत्रातच ते अधिक संख्येने रहायवयास आहेत.त्यामुळे त्यातील एकाला मतदान करून बाकीच्या दोघांचा रोष ओढवून न घेण्याच्या मानसिकतेतून,तर त्यांनी `नोटा` दाबल्याची कुजबूज ऐकायला मिळाली.चिंचवडमध्ये पाच लाख ६८ हजार ९५४ मतदारांपैकी दोन लाख ८७ हजार १४५ जणांनी मतदान केले. त्यातील दोन हजार ७३१ जणांनी `नोटा` चा पर्याय निवडला.हा आकडा कसब्यात फक्त एक हजार ४०१ एवढा राहिला.

कसब्यात १६ उमेदवार होते. त्यातील १४ जणांचे डिपॉजिट जप्त झाले. तर, चिंचवडमध्ये २८ पैकी २६ जणांवर ही पाळी आली. कसब्यात १६ पैकी दहा उमेदवारांना मते घेण्यात तीन आकडी मजल मारत न आल्याने त्यांना दोन आकड्यांतच मर्यादित रहावे लागले.राज्यातील प्रत्येक निवडणुकीत उभे राहून हसे करून घेणाऱे सातारकर `बिग बॉस फेम` अभिजित आवाडे बिचकुलेचा त्यात समावेश आहे. त्यांना अवघी ४७ मते मिळाली आहेत. तर,चिंचवडला २८ उमेदवारांपैकी फक्त सहाजणांना दोन आकडी मते मिळवता आली आहेत.तुलनेने कसब्यातील मतदारांनी अपक्षांना अधिक संख्येने डावलून आपले मत वाया जाणार नाही,याची काळजी घेतल्याचे दिसून आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com