Market Committee Election : मार्केड यार्ड नसूनही मावळात भाजप, राष्ट्रवादीत कलगीतुरा

Maval Market Committee Election : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत आली आहे.
Market Committee Election
Market Committee ElectionSarkarnama

Pimpri-Chinchwad News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. बाजार समितीसाठी शुक्रवारी (ता. 28) मतदान होणार आहे. त्यामुळे बुधवारी (ता. 26) प्रचार संपणार असल्याने शेवटच्या टप्यात अधिक रंगात आली आहे. मार्केट यार्डअभावी एक रुपयाची उलाढाल नसलेल्या मावळ बाजार समितीच्याही प्रचारात भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

राजकारणात कोण कधी कुणाचा शत्रू आणि मित्र होईल वा त्यात शत्रूत्व वा मित्रत्व हे कसे कायम राहत नाही, याचा प्रत्यय बाजार समिती निवडणुकीत आला आहे. कारण खेडला (जि. पुणे) स्थानिक आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप मोहिते पाटील यांच्या बाजार समितीतील सत्तेविरुद्ध त्यांचे सारे राजकीय प्रतिस्पर्धी या निवडणुकीत पुन्हा एकवटले आहेत.

Market Committee Election
Ajit Pawar : अजित पवारांचा बारामतीकरांना शब्द; मी राष्ट्रवादी सोडून जाणार नाही...

भाजपने तेथे चक्क आपले हाडवैरी ठाकरे शिवसेनेला जवळ केले आहे. शिंदे शिवसेना, तर बरोबर आहेच. म्हणजे तेथे महाविकास आघाडीला तडा गेला आहे. तसेच काहीसे मावळमध्येही घडले आहे. तेथे राष्ट्रवादीचेच आमदार सुनील शेळके यांच्याविरोधात भाजपने आघाडीतील कॉंग्रेसला (Congress) जवळ केले आहे.

खेडला आ. मोहितेंच्या श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनेलचे प्रतिस्पर्धी भाजप, ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेनेचे श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलचे आधारस्तंभ आणि भाजपचे पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी बाजार समिती आवारातील बजबजपुरी फोटो काढून मांडली.

Market Committee Election
Kolhapur News : सभासदांनी टोचले नेत्यांचे कान; आरोप-प्रत्यारोपांना कंटाळले : मत पेटीत निघाल्या अनेक चिठ्ठ्या

तसेच समितीत भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप त्यांनी केला. मात्र, ते मोहितेंनी गेले वर्षभर समितीवर प्रशासक असल्याचे सांगत हे आरोप खोडून काढले. तसेच आता बाजार समितीला एकत्र आलेल्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (पीडीसीसी) निवडणुकीत पाठिंबा देण्यास नकार दिल्याने त्यावेळी बुट्टे यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

खेडसारखाच कलगीतुरा एक रुपयाचाही उलाढाल नसलेल्या मावळ बाजार समिती निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीत व त्यातही राष्ट्रवादीचे आमदार शेळके आणि भाजपचे माजी आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांच्यात रंगला आहे. राष्ट्रवादीचे सहकार, तर भाजपचे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी परिवर्तन पॅनेल तेथे आहे. बाजार समिती हा राष्ट्रवादीने राजकीय अड्डा बनविल्याची टीका भेगडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केली. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना काही करता आले नाही, म्हणून आम्ही तरुण उमेदवार दिल्याने यावेळी मावळ नाही, तर पुणे जिल्ह्यात परिवर्तन झालेले दिसेल, असा दावा त्यांनी केला.

Market Committee Election
Amal Mahadik Leading: अटीतटीच्या लढतीत माजी आमदार अमल महाडिकांची मोठी आघाडी

तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती निवडणुकीत कॉंग्रेसमधील एका गटाची मदत घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तर, आमदार शेळके यांनी माजी आमदार भेगडेंचा दावा फेटाळला. त्यांच्याकडे माणसेच नसल्याने आमची लोकं (आघाडीतील कॉंग्रेसची) फोडून त्यांनी ते त्यांचे उमेदवार म्हणून उभे केले असल्याचा टोला त्यांनी लगावला. बाजार समितीत पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला. तसेच सत्तेत येताच लगेच मार्केट यार्ड सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com