
Pune News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत वाल्मिक कराड याने आपण सरेंडर करणार असल्याचं सांगत संतोष देशमुख प्रकारात आपला कोणताही हात नसल्याचं सांगितला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी वाल्मिक कराड याचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जात आहे. त्याला अटक का केली जात नाही? असा सवाल राज्यभरातून उपस्थित केला जात असतानाच वाल्मिक कराड हा 'सीआयडी'ला शरण आला आहे. शरण येण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये त्याच्यावरती केलेल्या सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत.
या व्हिडिओमध्ये वाल्मीक कराड म्हणाला, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची केस माझ्यावरती दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामीन घेण्याचा अधिकार असताना देखील मी सीआयडी ऑफिस पाषाण येथे सरेंडर होत आहे.
संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असशील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषा पोटी माझं नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे. पोलीस तपासामध्ये जर या प्रकरणात मी दोषी आढळलो तर न्यायदेवता जी मला शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.