मनसेच्या वसंत मोरेंना दाखवला कात्रजचा घाट

वसंत मोरे यांच्यासाठीचा प्रभाग कात्रजच्या घाटापर्यंत (कात्रज बोगदा) जोडल्याने यानिमित्ताने मोरेंना कात्रजचा घाटच दाखविण्याचा डाव असल्याची चर्चा रंगली आहे.
Vasant More
Vasant Moresarkarnama
Published on
Updated on

पुणे : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा मंगळवारी जाहीर झाला आहे. प्रभाग रचना पाहता हा आराखडा राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल असल्याची चर्चा रंगली आहे, तसेच भाजपनेही आपल्यासाठीही ही रचना सोयीचा असल्याचे सांगितले आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाची किल्ली हाती असलेले मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS Vasant More) यांचीही परसलेल्या प्रभागाने पंचाईत केल्याचे दिसत आहे. मोरे यांच्यासाठीचा प्रभाग कात्रजच्या घाटापर्यंत (कात्रज बोगदा) जोडल्याने यानिमित्ताने मोरेंना कात्रजचा घाटच दाखविण्याचा डाव असल्याची चर्चा रंगली आहे.

पुण्यातील नव्या प्रभागरचने महापालिकेतील (ward structure pune corporation) सत्ताधारी भाजपच्या बड्या नेत्यांना राजकीय कोलदांडा घातल्याचे बोलले जात असतानाच मोरेंचे कट्टर विरोधक आणि भाजपचे आमदार योगेश टिळेकरांच्या उरल्यासुरल्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याच्या उद्देशाने त्यांचा प्रभाग फोडून मोरेंच्या वाट्याला दिल्याचे चित्र आहे. टिळेकरांच्या २५ वर्षांचा बालेकिल्ला उध्दवस्त करून नव्याने कात्रज - गोकुळनगर (प्रभाग क्र. ५८) निर्माण केला आहे. याच प्रभागांतून मोरे हे आपले नशीब अजमाविणार असल्याचे सांगण्यात येते.

मोरेंना मानणारा पारंपरिक मतदार लांब करून त्यांनाही सौम्य झटके देण्याची संधी या प्रभागरचनेतून साधली गेल्याचे दिसत आहे. याआधीच्या म्हणजे, २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही मोरेंच्या कात्रजमधील जुन्या प्रभागाचे तुकडे केल्याने त्यांना शेजारच्या प्रभागात लढावे लागले. मात्र, आपली राजकीय कमान उंचाविण्यासाठी झटणारे मोरे जिंकले. या निवडणुकीतही पुन्हा प्रभाग फोडून मोरेंपुढील अडचणींचे बॅरिकेडस उभारले आहेत.

कात्रज पट्ट्यात टिळेकरांना शह देताना मोरेंना धक्का देण्याची चाल या प्रभागरचनेतून खेळली गेल्याचे दिसत आहे. त्यातून या प्रभागाला मांगडेवाडी, खिलारेवाडी, भिलारेवाडी आणि येवलेवाडीसह टिळेकरांची हुकूमत असलेला परिसर जोडला आहे. मोरे यांच्यासाठीचा प्रभाग कात्रजच्या घाटापर्यंत (कात्रज बोगदा) जोडल्याने यानिमित्ताने मोरेंना कात्रजचा घाटच दाखविण्याचा डाव असल्याची चर्चा रंगली आहे. तरीही, केवळ प्रभाग (५८) नव्हे आजूबाजुच्या दोन म्हणजे प्रभाग (५६, ५७) मधूनही मनसेचे उमेदवार विजयी करण्याचा चंग मोरेंनी बांधला आहे.

Vasant More
योगींमुळे २६ दिवस कारागृहात गेलेल्या पूजा शुक्ला 'सायकल'वर स्वार

कात्रज भागातील विशेषत: हडपसर विधानसभा मतदारसंघात टिळेकर-मोरे यांच्यातील राजकीय वैर हे पुण्याच्या राजकारणात नेहमीच लक्ष वेधून घेणारे ठरते. विधानसभेच्या (२०१९) च्या निवडणुकीत टिळेकरांच्या पराभवाचे धनी ठरलेल्या मोरेंना पुढे करीत, करून महापालिकेच्या निवडणुकीतही टिळेकरांना रोखण्याची रणनीती राष्ट्रवादीने आखली आहे. त्याला भाजपमधील टिळेकरांच्या विरोधकांनीही हातभार लावल्याचे सांगण्यात येत आहे.

टिळेकरांच्या आई रंजना टिळेकर, त्यानंतर स्वत: योगेश टिळेकर यांनी नेतृत्व केलेल्या प्रभागाची मोडतोड करून टिळेकर कुटुंबियांच्या राजकारणाला ब्रेक लावण्याचा पहिला प्रयत्न प्रभागरचनेच्या माध्यमातून केला गेला आहे. हडपसर विधानसभा हातातून निसटल्यानंतर तुर्त तरी टिळेकरांकडे आई रंजना टिळेकर नगरसेविका असलेल्या प्रभागात वर्चस्व आहे. कात्रजमधील प्रामुख्याने कात्रज कोंढवा रस्त्याच्या काही भागांत साधारपणे २० वर्षे तरी टिळेकरांचे अस्तित्त्व टिकून आहे. परंतु, नव्या प्रभागरचनेतूनही तेही संपवून टिळेकर यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचा बंदोबस्त महाविकास आघाडी करून झाला आहे. त्यासाठी टिळेकरांचे राजकीय शत्रू मोरेंना काही प्रमाणात बळ देऊन या दोघांमधील संघर्ष कायम ठेवला गेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com