Eknath Shinde & Warkari : वारकरी महामंडळामागं सरकारचा राजकीय डाव? वारकऱ्यांचा थेट CM शिंदेंनाच इशारा

Maharashtra Politics : वारकरी राजकारण्यांचे पुनर्वसन करण्याचे ठिकाण नाही. त्यामुळे दोन आठवड्यात सरकारने निर्णय रद्द करावा, असे आवाहनही करण्यात आले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur Wari : महाराष्ट्र सरकारने वारकरी महामंडळ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला फडकरी आणि समस्त वारकरी व वारकरी साहित्य परिषदेने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सरकारला वारकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागणार असल्याचं चिन्ह दिसू लागलं आहे. यावर सरकार आता काय निर्णय घेणार, याकडे वारकऱ्यांसह राज्याचे लक्ष लागले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज वाल्हे या ठिकाणी मुक्कामी आहे. वाल्हेकरांनी या पालखीचे स्वागत केले. या स्वागतानंतर दिंडी प्रमुख, फडकरी, वारकरी साहित्य परिषद यांची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिंड्यांना निधी दिल्याबद्दल आभारही मानले. तसेच राज्य सरकारला इशाराही दिला आहे.

वारकऱ्यांमध्ये सरकारकडून राजकारण आणलं जात आहे. वारकरी सोडून इतर राजकीय लोकांच्या पुनर्वसनासाठी वारकरी महामंडळ करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. हा निर्णय वारकरी संप्रदायाला पटणारा नाही. त्यामुळे हा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अन्यथा मोठे आंदोलन उभा करू, असा इशारा फडकरी मालक संघटनांनी सरकारला दिला आहे.

दिंडी प्रमुख, वारकरी व देवस्थान समितीमध्ये समन्वय आहे. कुठलाही समन्वय बिघडलेला नसताना सरकारकडून वारकरी महामंडळ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वारकरी संप्रदायाला पटलेला नाही. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा.

आता दिंडी प्रमुख वारकरी साहित्य परिषद आंदोलनाच्या तयारीत आहे. सरकारने आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा दोन दिवसांत बैठक घेऊन फडकरी व साहित्य परिषद आपली भूमिका जाहीर करेल, अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली.

राजकीय लोकांचे पुनर्वसन करण्याचं वारकरी महामंडळ हे ठिकाण नाही. आमचा कोणालाही विरोध नाही प्रत्येकाने वारीत यावं, मात्र वारीच्या नावाखाली राजकारण करू नये असं फडकरी संघटनेचे मालक महाराज यांनी दिली.

दरम्यान, राज्य सरकारने दिंड्यांना 20 हजार रुपयांचा अनुदान दिले आहे. पुढील वर्षी हे अनुदान अजून वाढून मिळेल, असा आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. मात्र त्यांनी वारकरी महामंडळाचा जो निर्णय घेतलाय त्याला आमचा विरोध आहे, असे वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने ठणकावून सांगितले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com