Pimpri-Chinchwad : पिंपरी महापालिकेत चाललंय काय? आता ओसीटी मशिन खरेदीतही घोटाळा

Pimpri-Chinchwad : हाय सक्शन नंतर आता 'ओसीटी' मशीन खरेदीत घोटाळा
Pimpri-chinchwad News
Pimpri-chinchwad NewsSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी सत्ताधारी भाजपचे नुकतेच निधन झालेले शहरातील (चिंचवड) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनी पालिका प्रशासनाच्या त्यातही वैद्यकीय विभागाच्या घोटाळ्याचे एक मोठे प्रकरण (हाय व्हॅकूम सक्शन मशिन खरेदी) नुकतेच बाहेर काढले होते.

त्यानंतर आता शहरातील दुसरे आमदार राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी वैद्यकीय विभागाचाच ओसीटी मशिन खरेदीतील दुसरा घोळ समोर आणला आहे. त्यामुळे पालिका प्रशासन दुहेरी कात्रीत सापडले आहे.

Pimpri-chinchwad News
Raj Thackeray : अदानींच्या भेटीनंतर राज ठाकरे थेट फडणवीसांच्या बंगल्यावर : चर्चांना एकच उधाण!

पिंपरी पालिकेच्या १५१ कोटी रुपयांच्या जॅकवेल बांधणीच्या निविदेत २० ते २५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आ.जगताप यांनी गेल्या महिन्यात केला होता. त्यानंतर त्यांनी पिंपरी पालिकेचा दीड कोटी रुपयांचा हाय सक्शन मशिन खरेदी घोटाळा त्याच महिन्यात उघडकीस आणला.

जवळजवळ दुप्पट किमतीने या मशिन पालिकेने वायसीएम रुग्णालयासाठी खरेदी केल्या होत्या. त्याबाबत त्यांना हिवाळी अधिवेशनात तारांकिंत प्रश्न विचारला होता. त्याच्या उत्तरात ही मशिन पुरवठा करणाऱ्या सेवर्ड सिस्टीम INC बोरिवली, मुंबई या ठेकेदाराचा आदेश रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत सांगितले होते.

Pimpri-chinchwad News
Shivsena : आढळरावांचे राष्ट्रवादी-शिवसेनेला धक्के; भोसरीत इनकमिंग

दरम्यान, हाय व्हॅकूम सक्शन मशिन खरेदीचा घोटाळा निस्तरला जातोय न जातोय तोच वायसीएमच्याच 'ओसीटी' मशीन खरेदीतील दुसरा घोळ समोर आला आहे. त्याबाबत आ.बनसोडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार करीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. वायसीएममध्ये डोळे तपासणीसाठी पालिकेच्या भांडार विभागाने या ओसीटी मशीनची खरेदी केली आहे.

मात्र, ती करताना पालिकेचे भांडार उपायुक्त, वायसीएमचे वैद्यकीय अधिष्ठाता, बॉयोमेडीकल इंजिनिअर यांनी ठेकेदाराशी केलेल्या वाटाघाटीमुळे स्पेसिफिकेशन बदलून तिचा पुरवठा केला गेला असल्याचा आरोप आ. बनसोडेंनी केला. म्हणून त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

त्यामुळे आता हाय व्हॅकूम सक्शन मशिन खरेदीतील घोटाळ्यानंतर जसा ती खरेदीचा ठेकेदाराचा आदेश रद्द करण्यात आला. तशीच अॅक्शन ओसीटी मशिन खरेदी घोळावरही होणार का याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com