रोहित पवार मंत्री कधी होणार ? शरद पवार यांनीच दिले उत्तर!

पक्षाचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांचे आपल्याकडे विशेष लक्ष असल्याचे सिद्ध करण्यात गेल्या काही वर्षात आमदार रोहित पवार यशस्वी झाले आहेत.

Rohit Pawar-Sharad Pawar
Rohit Pawar-Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार मंत्री कधी होणार, असा प्रश्‍न पुण्यात एका कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर मला आमदाराचा नामदार व्हायला पाच वर्षे लागली, असे उत्तर पवार यांनी दिले. त्यामुळे आमदार होऊन अडीच वर्षे झालेल्या रोहित पवार यांना मंत्री होण्यासाठी आणखी किमान अडीच वर्षे थांबावे लागेल, अशी चर्चा या कार्यक्रमानंतर सुरू झाली.


Rohit Pawar-Sharad Pawar
राष्ट्रवादीच जोमात; आघाडी झाली तरच शिवसेना अन् काँग्रेस फायद्यात

रोहित पवार यांच्या मंत्रीपदाच्या प्रश्‍नावर थेट उत्तर न देता पवार म्हणाले, ‘‘ मी १९६७ साली आमदार झालो. नामदार होण्यासाठी त्यानंतर मला पाच वर्षे वाट पाहावी लागली.’’ पवार यांनी दिलेल्या या उत्तरामुळे रोहित पवार यांना मंत्री होण्यासाठी आणखी किमान अडीच वर्षे तरी वाट पाहावी लागेल, अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली.


Rohit Pawar-Sharad Pawar
किरीट सोमय्या म्हणाले, तेरा क्या होगा कालिया?

राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबियांचा मोठा दबदबा आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार केवळ शरद पवार यांचे डावपेच आणि पुढाकारामुळे अस्तित्वात आले आहे. या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार काम पाहत आहे. राज्याच्या कारभारात त्यांचा दबदबा आहे.


Rohit Pawar-Sharad Pawar
Osmanabad : शिवसेनेची ताकद अफाट ; आपल्याला काॅंग्रेस-राष्ट्रवादीची गरज नाही..

पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे खासदार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे आता रोहित पवार मंत्री कधी होणार याची चर्चा माध्यमांमध्ये नेहमीच होत असते. रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, त्यांचा राज्यभर सर्वत्र संपर्क वाढत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.

पक्षाचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांचे आपल्याकडे विशेष लक्ष असल्याचे सिद्ध करण्यात गेल्या काही वर्षात आमदार रोहित पवार यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आमदार पवार अद्याप मंत्रीमंडळाबोहर कसे असा प्रश्‍न विचारण्यात येतो. मात्र, पवार यांच्या धोरणानुसार पुरेसा अनुभव घेतल्याशिवाय कुणालाही सत्तेची महत्वाची पदे दिली जात नाहीत. त्यामुळे मंत्री होण्यासाठी आमदार रोहित पवार यांना आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार हे स्पष्ट होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com