पुण्याचा पालकमंत्री ठरला का? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले...

Chandrakant Patil : आता फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढवावी,अशी मागणी होत आहे.
Devendra Fadnavis-chandrakant Patil Latest News
Devendra Fadnavis-chandrakant Patil Latest News Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुण्याचे (Pune District Guardian minister) पालकमंत्री कोण होणार, याविषयी गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तूळात उत्सुकता आहे. कारण पुण्यातील राजकीय केंद्रबिंदू हाच पालकमंत्री राहणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच पुण्याचे पालकमंत्री होतील,अशी जोरदार चर्चा होत आहे. मात्र अद्याप पुण्याचा पालकमंत्री ठरला नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे. (Devendra Fadnavis-chandrakant Patil Latest News)

Devendra Fadnavis-chandrakant Patil Latest News
फडणवीस पुण्याचे पालकमंत्री झाल्यास.. अमृता फडणवीस म्हणतात...

नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री चंद्रकात पाटील हे शिरूर येथे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना शिक्रापूरकर परिसरातील पदाधिका-यांनी गराडा घालताच वाबळेवाडी शाळेचा विषय उपस्थित झाला. यावेळी वाबळेवाडीचे वतीने सतीश वाबळे यांनी पुढे होत चंद्रकांत पाटलांना हा विषय सांगण्याचा प्रयत्न करताच त्यांनी वाबळे तसेच राजाभाऊ मांढरे यांना सूचित केले की, `तुम्ही आता पुढे व्हा अन बोला तुमच्या पालकमंत्र्यांशी! अशी सूचना केली होती. त्यावेळपासून फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार, अशी जोरदार चर्चा होत आहे.

याबरोबरच आता फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढवावी, अशी मागणी आजच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून केली आहे. यामुळे खरच फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होतील का? , अशा चर्चा रंगायला सुरू झाल्या आहेत.

याआधी कोल्हापूरवरून येत कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर त्यांना पुण्याच पालकमंत्रीपद दिल होत. त्यामुळे यावेळी पुण्यासारख्या महत्वाच्या आणि २१ विधानसभा मतदारसंघ असलेल्या जिल्यातच राष्ट्रवादीला घेरण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो, मात्र अद्याप अधिकृतरित्या पालकमंत्री म्हणून कुणाच्याच नावाची घोषणा झालेली नाही. यामुळे याबाबात रोजच चर्चा होत आहेत. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना पाटील यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री अजून ठरला नसल्याचे सांगितले आहे.

Devendra Fadnavis-chandrakant Patil Latest News
अजितदादांचा उमेदवार विरुद्ध शरद पवारांचा उमेदवार, अशी चर्चा झाली तेव्हा...

याचबरोबर पाटील यांनी दहीहंडी उत्सवाबद्दल बोलतांना म्हणाले की, कोरोनमुळे २ वर्ष कुठेले ही सण आपल्याला साजरा करता आला नाही. सगळीकडे बंधन होती. मात्र कोरोना संपला आहे असं म्हणता येणार नाही. पण त्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे सगळे सण आपण उत्साहात साजरे करणे सुरू केले आहे. या सरकार ने लोकांच्या भावना लक्षात घेऊन सुट्टी घोषित केली आहे. याबरोबरच १० लाखांचा विमा आपण गोविंदांना दिला आहे. दहीहंडी हा खेळांच्या यादीत सामील झाला आहे. मात्र दिलेल्या आरक्षणाबाबात काही गैरसमज झाला आहे. खेळाडूंना वेगळं आरक्षण दिले आहे असे अनेकांना वाटत आहे. पण तसे नसून खेळाच्या कोट्या मध्ये हे आरक्षण दिल्याचे पाटलांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com