By Electon : वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर ठरविणार चिंचवडचा नवीन आमदार कोण?

Chinchwad : चिंचवडला लाखाच्या लीडचा दावा फोल ठरविणार, गतवेळपेक्षाही ते कमी होणार
Chinchwad Bypoll Election
Chinchwad Bypoll ElectionSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवणुकीसाठी आज मतदान झाले. त्यानंतर तेथील तिन्ही प्रमुख उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा `सरकारनामा`कडे केला. मात्र, त्यातील कोण जिंकणार हे मात्र, २ मार्चला स्पष्ट होणार आहे.

चिंचवडमध्ये २८ उमेदवार असले तरी ही खरी लढत महायुती (अश्विनी जगताप), आघाडी (नाना काटे) आणि अपक्ष ठाकरे गट बंडखोर (राहुल कलाटे) अशी तिरंगीच झाली. तिन्ही उमेदवार गाववाले म्हणजे जगताप पिंपळे गुरव, काटे पिंपळे सौदागर, तर कलाटे वाकडचे आहेत.

Chinchwad Bypoll Election
Marathwada News : उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी प्रतिष्ठेच्या निवडणुकीत विजय खेचून आणला : मराठवाड्यात पुन्हा गड राखला

या तिघांपैकी कुणाच्या भागात जास्त मतदान झाले, ते निर्णाय़क ठरणार आहे. त्यामुळे हे तिन्ही भागच म्हणजे तेथे झालेले मतदान हे चिंचवडचा नवीन आमदार कोण हे ठरविणार आहेत. जिथे तुलनेने अधिक मतदान झाले आहे. तेथील उमेदवाराचा विजयाची अधिक संधी राहणार आहे.

दरम्यान, लाखाच्या लीडने चिंचवडचा पक्षाचा उमेदवार निवडून येईल हा भाजपने केलेला दावा, मात्र फोल ठरणार आहे. कारण गतवेळी थेट लढत असूनही तसेच लक्ष्मण जगतापांसारखे अगोदर दोन वेळा आमदार राहिलेले मातब्बर रिंगणात असूनही त्यांना ३८ हजार ४९८ मतांचे मताधिक्य होते. यावेळी, तर लढत तिरंगी असल्याने गतवेळपेक्षाही कमी मताधिक्याने यावेळी विजय होणार असल्याचे मतदानाची आकडेवारी सांगत आहे.

Chinchwad Bypoll Election
Kasba By-Poll Electon : शेवटचे काही मिनिटे शिल्लक असताना मोठी गर्दी : मतदान न करताच काही जण परतले!

ज्यादिवशी भाजपने मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता. येत्या २ मार्च रोजी मतमोजणीतून मतदारांचा भाजपवरील विश्वास आणखी दृढ झालेला असेल. माझा विजय होणार याची खात्री आहे, असे जगताप म्हणाल्या. त्यांच्या म्हणण्याला पक्षाचे शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दुजोरा दिला.

मोठ्या फरकाने आमचा उमेदवार विजयी होईल, असे ते म्हणाले. तर, एकीचं बळ देणार फळ या उक्तीचा प्रत्यय विजयाने सत्यात उतरणार आहे, असे राष्ट्रवादीचे काटे म्हणाले. तर, अपक्ष कलाटे यांनीही आपल्या विजयाची खात्री दिली. तो २ मार्चला दिसेल, असा दावा त्यांनीही केला.

Chinchwad Bypoll Election
Bandal On Adhalrao : आढळराव सगळे विसरून भेटायला आले; पण, ज्यांच्यासाठी केले ते मात्र विसरले : बांदलांचा खासदार कोल्हेंवर निशाणा

दरम्यान, दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी लगेच देण्यात येत होती. मात्र, सहाला ते संपूनही पावणेतीन तासानंतरही ती दिली न गेल्याने त्याबाबत मोठी चर्चा रंगली. मात्र, गतवेळेपेक्षा किंचीत कमी म्हणजे पन्नास टक्के ते होईल, असा अंदाज आहे.

त्यामुळे कमी मतदान झाले, तर त्याचा फटका बसणार किंवा फायदा होणार? हे यावेळी होण्याची शक्यता दिसत नाही. फक्त बंडखोरीचा फायदा वा नुकसान कुणाला होणार हे मात्र, २ तारखेला कळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com