RPI Pune City President : आरपीआय (आठवले गट) पुणे शहराध्यक्ष कोण होणार? तिरंगी लढतीतून मोठी चुरस..

RPI Pune City President Election : शहर कार्यकारिणीसाठी निवडणूक पार पडणार..
RPI Pune City President
RPI Pune City President Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) पक्षाची नवीन शहर कार्यकारणी निवडीची प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी आता इच्छुकांची लगबग सुरू आहे. शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांची नावे पुढे आली असून, आता शहराध्यक्षपदासाठी तिरंगी लढतीतून मोठी चुरस निर्माण होत आहे. (Latest Marathi News)

RPI Pune City President
Shivsena News : शंभूराज देसाईंच्या मतदारसंघात उद्या संजय राऊतांची तोफ धडाडणार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) माजी अध्यक्ष यांनी ही माहिती काल शुक्रवार(दि. २४ जून) पत्रकार परिषेदेत दिली आहे. यावेळी पक्षाचे माजी अध्यक्ष अशोक कांबळे आणि पक्षाचे पदाधिकारी श्याम सदाफुले हे देखील पत्रकार परिषेदेत उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नवीन शहर कार्यकारिणीच्या पुनर्बांधणीसाठी शहरात नव्याने अध्यक्ष आणि नवी कार्यकरिणी सदस्य नियुक्तीची पक्रिया पक्षाकडून सुरू आहे. पक्षाचे संजय सोनावणे, शैलेंद्र चव्हाण, तसेच हबीब सय्यद हे तिघेही शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.

RPI Pune City President
Pankaja Munde: "बीआरएसच्या आधीच पंकजा मुंडे यांना होती 'एमआयएम'ची ऑफर"

नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सभासद नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही सभासद नोंदणी मोहीम २५ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. कार्यकारणी निवडीसाठी १९ जुलै रोजी इच्छुक उमेदवारांना निवडणुकीसाठी चिन्ह दिले जाणार असून, याच दिवशी सदस्यांची मतदान यादी जाहीर करण्यात येणार आहेत. तर सहा ऑगस्ट रोजी यासाठी मतदान पार पडणार आहे.

दरम्यान या कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पक्षाचे राज्याचे सचिव बाळासाहेब जानराव, राज्य उपाध्यक्ष असित गांगुर्डे, माजी शहराध्यक्ष अशोक कांबळे, अशोक शिरोळे व श्याम सदाफुले यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com