Amit Shah on Co-operative sector: कार्यक्रमासाठी अमित शाहंनी पुण्याचीच निवड का केली? फडणवीसांनी सांगितलं कारण

Devendra Fadanvis News : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाहंनी आज पुण्यातून कॉपरेटिव्ह सोसायटीच्या डिजीटल पोर्टलचे उद्घाटन केले.
Devendra Fadanvis  News :
Devendra Fadanvis News : Sarkaenama
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाहंनी आज पुण्यातून कॉपरेटिव्ह सोसायटीच्या डिजीटल पोर्टलचे उद्घाटन केले. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात या पोर्टलटचे अनावरण करण्यात आले, पण यासाठी त्यांनी पुण्याचीच निवड का केली, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.

फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्राची भूमी ही सहकाराची भूमी आहे. पद्मश्री विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांनी या महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली, त्यानंतर देशभरात सहकाराची बिजं रोवली गेली, सहकारातून समृद्धी येऊ शकते, अशा प्रकराची व्यवस्था महाराष्ट्राने उभी केलीत, त्यातूनच महाराष्ट्र सहकार क्षेत्र निर्माण झालं.

अमित शाहंनी सहकारीता मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी एक नवा कायदा केला. या कायद्यांतर्गत देशभरात गावपातळीपर्यंत सहकाराच जाळं नेलं पाहिजे, यासाठी व्यवस्था उभी केली. ही व्यवस्था डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी आधुनिक आणि सुलभ पोर्टल सुरू केलं या पोर्टलंच उद्घाटन दिल्ली किंवा गुजरातमध्येही करू शकले असते, पण खऱ्या अर्थाने सहकाराची पंढरी ही महाराष्ट्र आहे आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्रातही पुणे जिल्हा निवडला. आज या पोर्टचे उद्घाटन पुणे जिल्ह्यात होत आहे.

सहकारीता मंत्रालय हाती घेतल्यानंतर त्यांनी ज्या गतीने बदल केले, कशा प्रकारे वारंवार शिष्टमंडळ जात असायचे आणि रिकाम्या हाताने परत फिरायचे. पण आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन अमित शहांना भेटलो त्यावेळी, त्यावेळी त्यांनी इनकम टॅक्स रद्द करण्याचंही आश्वासन दिलं. याआधी ज्या शिष्टमंडळांनी अर्थमंत्र्यांकडे जायचे, त्यांना अनेक कारणं सागितली गेली पण अमित शहांनी खऱ्या अर्थाने ही शेतकऱ्यांचा विचार केला. असही फडणवीसांनी नमुद केलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com