Supriya Sule : 'त्या' पुस्तकात सुनेत्रा पवारांचा उल्लेख कशासाठी? भुजबळांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

Rajdeep Sardesai Book Controversy: "राजदीप सरदेसाई यांनी एक पुस्तक लिहिल आहे. त्यामध्ये एक मोठा दावा करण्यात आला आहे. त्याबाबत मी अनेकदा संसदेमध्ये बोलले आहे. सरकारी संस्थांचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकून घर फोडणे, पक्ष फोडणे असंविधानिक कामं करणे यासारख्या गोष्टी अदृश्य शक्ती करत आहेत."
Chhagan Bhujbal, Sunetra Pawar,  Supriya Sule
Chhagan Bhujbal, Sunetra Pawar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 08 Nov : 'द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया' या राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ईडीपासून सुटका व्हावी, यासाठी आपण भाजपसोबत गेलो, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आला आहे.

त्यावरून आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP SP) खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, राजदीप सरदेसाई यांनी एक पुस्तक लिहिल आहे. त्यामध्ये एक मोठा दावा करण्यात आला आहे. त्याबाबत मी अनेकदा संसदेमध्ये बोलले आहे. सरकारी संस्थांचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकून घर फोडणे, पक्ष फोडणे असंविधानिक कामं करणे यासारख्या गोष्टी अदृश्य शक्ती करत आहेत.

Chhagan Bhujbal, Sunetra Pawar,  Supriya Sule
Sanjay Raut : "हा भोंगा गेले 20 ते 25 वर्ष…"; मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला

हे फक्त महाराष्ट्रासाठी मर्यादित नाही तर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत अशा प्रकारचं काम या शक्तीकडून करण्यात येत आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून ज्या कारवाया झाल्या आहेत. त्यामधील 95% कारवाया या विरोधी पक्षातील नेत्यांवर झाल्या आहेत. विरोधातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने (BJP) केले त्याच नेत्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून सत्ता स्थापन करण्याचे काम भाजपने केलं, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

तर अनेक गोष्टी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकांमधून आल्या आहेत. त्यामध्ये मला वाईट या गोष्टीचा वाटतं आहे की, यामध्ये महिलांचाही उल्लेख केला आहे. अदृश्य शक्ती ही फक्त पुरुषांच्या नाही तर महिलांच्या मागेही लागली आहे. माझ्या तीन मोठ्या बहिणींच्या घरावर पाच दिवस 'आयटी'ची रेड करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला खूप काही सहन करावं लागलं आहे.

Chhagan Bhujbal, Sunetra Pawar,  Supriya Sule
Sanjay Raut : "कमजोर हृदयाची माणसं पळून गेली"; भुजबळांचा दावा अन् राऊतांचा हल्लाबोल

या पुस्तकात सुनेत्रा पवार यांचाही उल्लेख आहे. त्यांचं नाव आणण्याची काय गरज होती? माझ्या बहिणींच्या घरी रेड टाकण्याचं कारण काय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. या पुस्तकात असं लिहिलं आहे की, शरद पवारांना दोन ते तीन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला, भाजपसोबत चला असं पवारांना सांगत होतो पण पवारसाहेब म्हणाले आम्ही जाणार नाही, असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com