पत्नीने बारामतीतून लोकसभा निवडणूक का लढविली, याचे राहुल कुल यांनी सांगितले हे कारण!

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीची निवडणूक चर्चेत आली होती.
Rahul kul-kanchan kul
Rahul kul-kanchan kul

माळशिरस : बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकसभेची उमेदवारी स्वीकारताना वरिष्ठांकडे कुठल्याही पदांची मागणी केली नव्हती. तर  मुळशी प्रकल्पातील पाणी जिल्ह्यातील या भागात आणण्यासाठी ची मागणी केली होती. याच मुळशी प्रकल्पाच्या मागणी वरती लोकसभेची उमेदवारी आपल्या सौभाग्यवतीने स्वीकारले होती, असा दावा दौंडचे आमदार आमदार राहुल कुल यांनी केला. 

राहुल यांच्या पत्नी कांचन यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात 2019 ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. पवार कुटुंबियांच्या जवळ असतानाही कुल कुटुंबाने हा निर्णय का घेतला, याची तेव्हा चर्चा होती. त्यावर आता कुल यांनी हे उत्तर दिले. या निवडणुकीत सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. तसेच कुल यांच्या दौंड विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी आघाडी घेतली होती. 

भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून अटल आरोग्य रथ या उपक्रमाचा शुभारंभ दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते आज माळशिरस येथे पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी माळशिरसचे माजी सरपंच अरुण यादव, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळ तात्या यादव, उपसरपंच गोकुळ यादव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गद्रे, आदिनाथ यादव उपस्थित होते.

यावेळी बोलताना राहुल कुल म्हणाले की, या भागातील पाणीप्रश्न मार्गी लागण्यासाठी पुरंदर उपसा व  जानाई शिरसाई या योजनांनी मोठा  हातभार लावला आहे. दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यांसह विदर्भ व मराठवाड्यातील भागाला योगदान ठरू शकेल अशा मुळशी प्रकल्पातील पाणी या  भागात आणण्यासाठी आग्रही मागणी केली होती. पत्नीने भाजपकडून लोकसभेची उमेदवारी स्वीकारताना देखील मी पक्षश्रेष्ठींकडे मला स्वतःला कुठल्याही पदाची मागणी केली नव्हती. मुळशी प्रकल्पातील पाणी या भागात आले पाहिजे, ही एकमेव मागणीच मी केली होती. या मागणीवरच माझ्या सौभाग्यवतीने लोकसभेची उमेदवारी स्वीकारली.

मुळशी प्रकल्पातील पाणी या भागात आणण्या बाबतचा अभ्यास करण्यासाठी तीन आमदार व इतर तज्ज्ञ लोकांच्या समावेश असलेली भावे व सुर्वे अशी दोन समित्या स्थापन केल्या. या समित्या लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करतील असे त्यांनी  सांगितले. या प्रकल्पाच्या उपलब्धतेबाबत सर्वपक्षीय एकमत सुरुवातीला होऊ शकले नाही. मात्र आता हे सर्वपक्षीय एकमत करण्यात यश आले असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com