Pimpri Chinchwad Politics : शरद पवार गटाच्या कामठेंचा भाजपला जोर का झटका; थेट लक्ष्मणभाऊंचा पीएच फोडला !

Rohit Pawar Active in Pimpri Chinchwad Politics : अजित पवारांना पाठिंबा दिलेले आमदार अण्णा बनसोडे यांचा पिंपरी राखीव मतदारसंघ टार्गेट...
Pimpri Chinchwad Politics
Pimpri Chinchwad PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजित पवारांचा एकेकाळचा बालेकिल्ला व त्यांचे आवडते शहर पिंपरी-चिंचवड आपल्या रडारवर घेतले आहे. त्यातही त्यांनी तेथील अजित पवारांना पाठिंबा दिलेले आमदार अण्णा बनसोडे यांचा पिंपरी राखीव मतदारसंघ टार्गेट केला आहे. त्यानंतर आता भाजपमधून आलेले त्यांचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी त्यांचा प्रभाग असलेल्या चिंचवड विधानसभेला सुरुंग लावण्याचे ठरवले आहे. त्याचा एक भाग म्हणून तेथील भाजपचे यापूर्वीचे आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांचे पीए सतीश कांबळे यांना आपल्याकडे खेचले. (Latest Marathi News)

Pimpri Chinchwad Politics
BJP Political News : आता खासदार होणार आमदार? राजस्थानसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

एखादा आमदार, खासदाराचा पराभव झाल्यास अथवा त्यांचे निधन झाले, तर त्यांचे पीए लगेचच दुसऱ्या कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना काम शोधतात. शिरूर लोकसभेला हे घडले. तेथे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील हे २०१९ ला हरताच त्यांचे पीए प्रबोधचंद्र सावंत हे विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे गेले.

असाच काहीसा प्रकार चिंचवड विधानसभेला घडले होते. तेथील भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे या वर्षी ३ जानेवारीला निधन झाले. आता त्यांचे पीए सतीश कांबळे यांनी काल राष्ट्रवादीची वाट धरली. मात्र, त्यामागील कारण वेगळे आणि भावनिक आहे. त्यांनी उद्योगनगरीची जबाबदारी सोपविण्यात आलेले पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना बढती देत राष्ट्रवादीने आपल्या प्रदेश डॉक्टर सेलचे समन्वयक लगेच केले.

आता राज्यभरातील रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे, असे या नियुक्तीवर बोलताना कांबळेंनी `सरकारनामा`ला सांगितले. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यामागील त्यांचे कारण मोठे भावनिक आहे. ते त्यांनीच 'सरकारनामा'ला सांगितले. दिवंगत लक्ष्मणभाऊंशी त्यांची भावनिक नाते होते. मात्र, आता तेच न राहिल्याने तेथे कामाला उत्साह वाटत नव्हता. त्यात राज्य पातळीवर रुग्णसेवेची संधी चालून आल्याने हा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. ते जगतापांच्या वैद्यकीय कक्षाचे काम पाहत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण जगतापांनी विधानसभेत अनेक तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी विचारलेल्या आहेत. तसेच मतदारसंघातील अनेक वैद्यकीय अडचणी मार्गी लागलेल्या आहेत.

Pimpri Chinchwad Politics
Assembly Election Survey : भाजप राजस्थान हिसकावणार; काँग्रेसचं तीन राज्यांत सरकार? काय सांगतो ताजा ओपिनियन पोल ?

कामठे यांनी गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप या आपल्याच पक्षाच्या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवला होता. त्यासाठी त्यांनी शहर कारभारी आणि दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊंनाही शिंगावर घेण्याचे धाडस केले होते. आता राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांनी भाजप तथा भाऊंचा गड़ असलेल्या चिंचवडला हादरे देण्याची योजना आखली आहे. त्याचा एक भाग म्हणून त्यांनी लक्ष्मणभाऊंचा मोहरा कांबळेंना टिपले आहे. कारण लोकप्रतिनिधीचा पीए खूप महत्त्वाचा असतो. त्याला त्या लोकप्रतिनिधींची खडान् खडा माहिती असते. त्यामुळे त्याने काम सोडले वा तो दुसऱ्या व त्यातही विरुद्ध पक्षाच्या आमदार वा खासदाराकडे गेला, तर सदर लोकप्रतिनिधीची मोठी पंचाईत होते. कांबळे पक्षात आल्याचा शहरातील रुग्णांना याचा नक्की फायदा होईल, असे कामठे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com