राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या, एक वर्षाच्या आत भामा आसखेडचा प्रश्न मार्गी लावू : खासदार सुप्रिया सुळे

"पाटेठाण येथील भामा आसखेड संपादीत केलेल्या शेतक-यांच्या जमिनी वगळण्यासाठी मी मुख्यमंत्री , जिल्हाधिकारी, पुर्नवर्सन विभागाचे मंत्री यांच्यासोबत यापुर्वी अनेकदा मिटींग झाल्या असून वारंवार पाठपुरावा देखील सुरू आहे. २०१९ जर तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता दिली तर सत्तेत आल्यावर एक वर्षाच्या आत 'भामा आसखेड' चा विषय मार्गी लावू," अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे दिली. यवत (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजीत निर्धार परिवर्तन मेळाव्यात त्या बोलत होत्या.
राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या, एक वर्षाच्या आत भामा आसखेडचा प्रश्न मार्गी लावू : खासदार सुप्रिया सुळे
Published on
Updated on

राहू (ता. दौंड)  : "पाटेठाण येथील भामा आसखेड संपादीत केलेल्या शेतक-यांच्या जमिनी वगळण्यासाठी मी मुख्यमंत्री , जिल्हाधिकारी, पुर्नवर्सन विभागाचे मंत्री यांच्यासोबत यापुर्वी अनेकदा मिटींग झाल्या असून वारंवार पाठपुरावा देखील सुरू आहे. २०१९ जर तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता दिली तर सत्तेत आल्यावर एक वर्षाच्या आत 'भामा आसखेड' चा विषय मार्गी लावू," अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे दिली. यवत (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजीत निर्धार परिवर्तन मेळाव्यात त्या बोलत होत्या.

भाजप सरकार हे घोषणाबाजी करणारे सरकार आहे. सरकारला सामान्य जनतेचे काहीही देणंघेणं नाही, असे सांगत त्यांनी भाजप सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.  या प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, रमेश थोरात, प्रदीप गारटकर, विश्वास देकाते, वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, नितीन दोरगे, गणेश कदम, सभापती झुंबर गायकवाड आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "जोपर्यंत मी बारामती मतदार संघाची खासदार आहे तोपर्यंत रेल्वेच्या संबधित विभागाकडून एकही झोपडपट्टी हलवू देणार नाही. पनवेल ते दौंड रेल्वे शटल सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मांजरी, कडेठाण, खुटबाव रेल्वे स्थानकासाठी सुमारे आठ कोटी रूपये निधी मिळाल्याने प्लॅटफार्मचे कामही अंतिम टप्यात आहे. दौंड रेल्वे जंक्शनला उत्कृष्ठ बगीचा करणार आहे. ज्येष्ठांसाठी सुरू केलेल्या वयश्री योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझ्या लोकसभा मतदार संघात जास्तीस जास्त निधी वापरून विविध विकासकामे करण्यावर मी भर दिला. दौंड तालुक्यात देखील भरघोस निधी दिला. वीस हजार अधिक विद्यार्थ्यांनींना सायकलींचे वाटप केले. मागील काही दहा वर्षांमध्ये विविध विकास कामे केली."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com