Ravindra Dhangekar News: लोकसभा लढणार का? धंगेकरांनी स्पष्टच सांगितलं

Pune : मुंबईप्रमाणे पुण्यातही सुविधा देण्याची मागणी
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama

Kasba News : पोटनिवडणुकीत भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत झालेल्या कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयाने काँग्रेसला आत्मविश्वास दिला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या विजयाने धंगेकरांचे नाव राज्यासह धंगेकर देशातही पोहचले आहे. विजयानंतर धंगेकर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्यासह राज्यातील मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या.

आता आगामी लोकसभेतील पुण्याच्या (Pune) जागेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. धंगेकरांनी मात्र त्यास नकार देत, मी कसब्यातच रमलो असल्याचे स्पष्ट सांगितले. दरम्यान, धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आज गुढीपाडवा हा सण साजरा केला. हिंदू नववर्षानिमित्त धंगेकरांनी पुणेकरांसाठी काही संकल्प केल्याचेही सांगितले.

Ravindra Dhangekar
Old Pension News : संपाचा फायदा कुणाला? कर्मचारी म्हणतात काटकरांनी विश्‍वासघात केला !

धंगेकर म्हणाले, "गुढीपाडवा हा हिंदू धर्मासाठी महात्वाचा सण असतो. जाती-धर्माची आडकाठी न ठेवता सर्वांची सेवा करणे ही हिंदुधर्माची (Hindu) शिकवण आहे. त्यानुसाच मी काम करत आहे. मतदारसंघात कुणाचीही काही अडचण असेल तर ती तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला जाईन. पुणेकरांच्या प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील असणार आहे. हे करताना सरकारने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. मुंबईप्रमाणे पुणेकरांनाही सुविधा मिळाव्यात, त्यासाठी काम करणार आहे."

पुणेकरांना आता पूर्वीप्रमाणे मिळकत करात ४० टक्के सवलत मिळत नाही. १०० टक्के कराच्या पावत्या महापालिकेकडून (PMC) दिल्या आहेत. ती सवलत पूर्ववत करण्याची मागणी विधानसभागृहात केली आहे. त्यास तत्वतः मान्यता मिळाल्याचीही माहिती धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दिली. ते म्हणाले, "पुण्यातील नागरिकांना आता पुर्वीप्रमाणे करात ४० टक्के सवलत मिळत नाही. त्यांना १०० टक्के कर भरण्याच्या पावत्या दिल्या आहेत. परंपरागत असलेली ४० टक्के सवलत पूर्वीप्रमाणे मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच पुण्यातील ५०० स्क्वेअरफुटापर्यंतच्या सर्व घरांना करमाफ करण्याची मागणीही केली आहे. सरकारने मुंबईप्रमाणे पुण्यातील नागरिकांसाठी निर्णय घ्यावा."

Ravindra Dhangekar
Gangapur Sugar Factory : गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर गंगापूर कारखान्यात पूजा, लवकरच होणार सुरू..

घराच्या करात सवलत मिळाली तर सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही धंगेकरांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, "आताचा कर भरणे नागरिकांसाठी अवघड होत आहे. पाचशे स्क्वेअरफूटपर्यंतच्या घरांमध्ये पुण्यातील मोठी जनता राहते. त्यात रिक्षाचालक, हातीगाडीवाले, टपऱ्याधारकांचा समावेश आहे. घराच्या करातून सवलत मिळाली तर सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. पुण्याचे अंदाजपत्रक १० हजार कोटींचे आहे. त्यातील २०० कोटी रुपये या करासाठी दिले तरी काही फरक पडणार नाही."

कसब्यातील (Kasba By Election) पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयानंतर धंगेकर हे आगामी लोकसभेतील पुण्याचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आपण लोकसभेसाठी इच्छूक नसून कसब्यातच रमलो असल्याचे धंगेकरांनी सांगितले. ते म्हणाले, "काँग्रसमध्ये काम करणारे अनेक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे काम मोठे असून लोकसभेसाठी इच्छूकही आहेत. मी कसब्यात पाच-सहा वर्षे रमणार आहे. मात्र लोकसभेसाठी पक्ष ज्या कुणाला उमेदवारी देतील त्यांच्या विजयासाठी मी व माझे कार्यकर्ते प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com