World Cup Final : विश्वचषकाच्या महामुकाबल्यावर सट्टेबाजीचे सावट; पुणे पोलिसांचे सट्टेबाजांवर बारकाईने लक्ष!

India Vs Australia : विविध ठिकाणी छापेमारीही केली जाऊ शकते
India Vs Australia World Cup 2023
India Vs Australia World Cup 2023Google
Published on
Updated on

Pune News : अहमदाबाद येथे आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकातील महामुकाबला अर्थातच अंतिम सामना सुरू आहे. केवळ देशभरातीलच नाही तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह व्हीव्हीआयपी व्यक्ती अहमदाबादेत पोहचले आहेत. तर दुसरीकडे या महामुकाबल्यावर कोट्यवधींचा सट्टा देखील लागला जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसही सट्टेबाजांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

India Vs Australia World Cup 2023
Rohit Pawar: भुजबळ भाजपची 'स्क्रिप्ट' वाचतात, त्यांना जाधव हे कॉपी करतात, या दोघांनाही फडणवीस...

महत्त्वपूर्ण क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी सुरू असते, आज तर विश्वचषकाचा महामुकाबला आहे. अशावेळी देशभरातील मेट्रो शहरं जसे की मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, कोलकाता, पुणे, बंगळुरू,चेन्नई इंदुर आदी ठिकाणांहून सट्टेबाज सक्रीय असतात आणि मोठ्याप्रमाणावर सट्टेबाजी होते.

सट्टेबाजीमधून कोट्यवधींची उलाढाल होत असते. पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरातही सट्टेबाजी होताना दिसून येते. या शहरांच्या आसपासच्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये सट्टेबाजीसाठी आलिशान बंगलेही सट्टेबाज भाड्याने घेताना दिसून येतात. आतापर्यंत भारतीय संघाची विश्वचषकातील दमदार कामगिरी पाहता, मोठ्याप्रमाणावर सट्टेबाजी होण्याची शक्यता दिसत आहे.

India Vs Australia World Cup 2023
Bachchu Kadu : भूसंपादन मंजुरीसाठी बच्चू कडूंनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नियम दाखवत धरले धारेवर !

या पार्श्वभूमीर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सट्टेबाजांवर करडी नजर ठेवली जात आहे. विविध ठिकाणी छापेमारीही केली जाऊ शकते आणि काही संशयितांना ताब्यातही घेतले जाऊ शकते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com