Ajit Pawar News : इंदापूरचे सुपुत्र दोन आमदार अजितदादांसोबत; भरणे अन् यशवंत मानेंनी दिला पाठिंबा

Dattatray Bharane, Yashwant Mane News : येणाऱ्या काळामध्ये अजितदादांची साथ देणार आहेत.
Ajit Pawar, Dattatraya Bharne, Yashwant Mane News
Ajit Pawar, Dattatraya Bharne, Yashwant Mane News Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Deputy CM News : इंदापूरचे आमदार व माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व मोहोळ (सोलापूर) चे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे पक्ष प्रतोद यशवंत माने या दोघांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शपथ विधीला हजेरी लावली. येणाऱ्या काळामध्ये अजितदादांची साथ देणार आहेत.

आज राज्याच्या राजकारणामध्ये अचानक भुकंप झाला. राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारसह (Ajit Pawar) राज्यातील महत्वाच्या आमदारांनी भाजप-सेना (शिंदे गटा) च्या सरकारमध्ये सहभागी झाले. अजित दादांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथ विधीला इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatreya Bharne) यांच्यासह सोलापूर जिल्हातील मोहोळ मतदार संघाचे आमदार व इंदापूरचे सुपुत्र यशवंत माने यांनी हजेरी लावून अजितदादांसोबत असल्याचे दाखवून दिले.

Ajit Pawar, Dattatraya Bharne, Yashwant Mane News
Ajit Pawar Deputy CM : अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांचा आकडा समोर; विधानसभेचे 40 तर विधानपरिषदेचे...

यासंदर्भात इंदापूरचे आमदार भरणे यांनी सांगितले की, आम्ही सर्वजण अजितदादांसोबत तसेच पवार कुंटूबासोबत आहोत. अजितदादा भाजप-सेने सोबत गेल्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार असून इंदापूरच्या विकासाला गती मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. तसेच मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी ही आम्ही मुंबईमध्ये असून सभागृहामध्ये आहे, असे स्पष्ट केले.

Ajit Pawar, Dattatraya Bharne, Yashwant Mane News
Sharad Pawar News : शरद पवारांचा प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंना इशारा; त्यांनी स्वत:हून कार्यवाही करावी अन्यथा...

अजितदादांच्या शपथविधीला उपस्थित होतो. अजितदादांसोबत कायम राहणार असून दादा सत्तेमध्ये गेल्यामुळे मोहोळच्या विकासाला गती मिळणार असल्याचे माने यांनी सांगितले. भरणे व माने अजितदादासोबत असल्याने येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्याच्या राजकारणाची दिशाही बदलणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com