Yuva Sangharsh Yatra Suspend : ...तर, होय मी घाबरलो ; युवा संघर्ष यात्रा स्थगित करताना रोहित पवारांचं विधान!

Rohit Pawar : ''ही यात्री आपण उद्या कधीतरी काढू, पण आज...'' असंही रोहित पवारांनी पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar and Maratha Reservation : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अवघ्या तीन दिवसांपूर्वी सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा त्यांनी स्वत:च स्थगित केली आहे. आज पुण्यातील शिरुर तालुक्यात पत्रकारपरिषद घेऊन त्यांनी याबाबत घोषणा केली. याचबरोबर असा निर्णय का घेतला याचे कारणही स्पष्ट केले.

रोहित पवार म्हणाले, ''आज महाराष्ट्र पेटला आहे, महाराष्ट्र आज अस्वस्थ आहे. आज विविध ठिकाणी तरूण आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यासाठी आम्ही लढतोय तीच मूलं जर आत्महत्या करत असतील तर मग अशा परिस्थितीत आपण यात्रा पुढे कशी घेऊन जाऊ शकतो.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar
Rohit Pawar News : मोठी बातमी ! आमदार रोहित पवारांनी 'युवा संघर्ष यात्रा' अचानक थांबवली; 'हे' आहे कारण

''एका गावात आम्हाला आडवलं होतं. आम्ही स्वत: जाऊन तिथे चर्चा केली. चर्चेनंतर ते स्वत: आमच्याबरोबर आले. त्यांचं मत आलं की आरक्षणाला तुम्हाला पाठींबा द्यावा लागेल, जो आम्ही दिलाच आहे. पण त्याबरोबरच तुम्ही जे घेतलेले मुद्दे आहेत, तेही महत्त्वाचे आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक गावात जाऊन ही भूमिका आम्ही घेऊ शकलो असतो. पण नाही, जर आपला महाराष्ट्र अशांत असेल. तर आम्हाला आमची दुसरी कोणती भूमिका घ्यायची नाही. ही यात्री आपण उद्या कधीतरी काढू. पण आज तरी नाही, आज आम्ही तूर्तास ही यात्रा स्थगित करत आहोत.'' असं रोहित पवारांनी जाहीर केलं.

याचबरोबर ''अनेक लोक मला भेटत असतात, परंतु मागील चार दिवसांपासून मी कोणताही फोन घेऊ शकलो नाही. कारण, ज्या गावात जातोय तिथे लोक आपल्या अडचणी घेऊन आले आहेत. प्रश्न एवढाच आहे की आमचा जो स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. तो सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. तो अशांत हे पटत नाही. अशांत हा युवांमुळे, युवांच्या अडचणींमुळे आहे. त्या अडचणी सुटाव्यात अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे.'' असंही रोहित पवार म्हणाले.

याशिवाय ''मी माझी भूमिका इथे सांगितलेली आहे. मी स्वत: मराठा आहे. माझी यात्री मी कशामुळे स्थगित करत आहे, हे मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल मी घाबरलो का? जर या महाराष्ट्रात युवा आत्महत्या करत असेल, तर होय मी घाबरलो. हा जो स्वाभिमानी, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. तो जर अशांत असेल तर होय मी घाबरलो. आज जर युवकांना संधी मिळत नसेल, त्यामुळे जर युवक वेगळा कोणता तरी निर्णय घेत असतील, तर होय मी घाबरलो.'' असं रोहित पवारांनी सांगितलं.

Rohit Pawar
Thorat Vs Vikhe : 'श्री गणेश' कारखान्याच्या बॉयलरपाठोपाठ, थोरात-विखेंमधील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे!

''आज जी परिस्थिती या महाराष्ट्रात बघत आहे, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा परिस्थितीत तुम्ही जर मला विचारत असाल तर होय मी घाबरलो. कारण ही परिस्थिती महाराष्ट्राच्या आज, उद्यासाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी पोषक नाही. अशी एक मराठी माणूस म्हणून आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून माझी भूमिका आहे आणि हा माझा विचार आहे.'' अशा शब्दांत रोहित पवारांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com