काल पंतप्रधान आले अन् आज पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली

महाविद्यालयास निवडणुकीच्या पूर्वी मंजुरी मिळावी यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची भेट घेतली होती.
Vikramkumar-Murlidhar Mohol
Vikramkumar-Murlidhar MoholSarkarnama

पुणे : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (Atal bihari wajpayee madical College)अखेर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) मान्यता दिली आहे. त्यामुळे या महाविद्यालयात यंदापासून १०० प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दौरा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही मान्यता आली आहे.

Vikramkumar-Murlidhar Mohol
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात महापौर मोहोळ ठरले ‘मॅन ऑफ दी डे’

शहरात वैद्यकीय महाविद्यालय असावे यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू होते. महापालिकेने राज्यशासनामार्फत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर ‘एनएमसी’च्या पथकाने पुण्यात येऊन महाविद्यालयातील वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वसतीगृह यासह इतर सुविधांची पाहणी केली होती. त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने महाविद्यालय सुरू करण्यास लगेच परवानगी देता येणार नाही, असे आयोगाने सांगितले होते. त्यानंतर गेल्या तीन-चार महिन्यात महाविद्यालय सुरू करण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी खर्च करून आवश्‍यक सामग्री, पुस्तके खरेदी केले. डॉक्टर-प्राध्यापकांची भरती केली.

Vikramkumar-Murlidhar Mohol
निवडणुका पुढे जाण्याच्या भीतीने इच्छुकांचे धाबे दणाणले !

महाविद्यालयास निवडणुकीच्या पूर्वी मंजुरी मिळावी यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशी ‘एनएमसी’च्या अधिकाऱ्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची तयारी किती झाली आहे, याचा आढावा घेतला. त्यामध्ये त्यांनी समाधान व्यक्त करून महाविद्यालय सुरू करण्यासाठी मौखिक मान्यता दिली होती. मात्र, त्याबाबतचे पत्र आज मिळाले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी १०० प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष बंगीनवार, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनीही प्रयत्न केले.

अंदाजपत्रकात १६१ कोटीची तरतूद

महापालिकेने वैद्यकीय महाविद्यालयाची तयारी करण्यासाठी गेल्यावर्षी अंदाजपत्रकात १४१ कोटींची तरतूद केली होती. २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात १६१ कोटी रुपये आयुक्तांनी उपलब्ध करून दिले आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी १२२ शिक्षक तर १२४ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यापैकी ७० शिक्षकांच्या जागा भरल्या गेल्या आहेत.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरी मिळणे हा शहरासाठी महत्त्वाची घटना आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकल्पनेपासून ते अंतिम मंजुरीपर्यंत पाठपुरावा केला. यात भाजपच्या सर्व नेत्यांची मला साथ मिळाली. यंदापासून १०० महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे याचा मला आनंद आहे.’’

महत्त्वाचे टप्पे

- २८ ऑगस्ट, २०१९ : मुख्यसभेत ठराव मंजूर

- २६ मे २०२० : वैद्यकीय ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य सरकारची मंजुरी

- १३ ऑगस्ट २०२० : वैद्यकीय ट्रस्टची नोंदणी

- २८ नोव्हेंबर, २०२० : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला महाविद्यालय संलग्न

- ७ मार्च २०२२ : १०० प्रवेशासाठी अंतिम मंजुरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com