चाकण : सांगवीतील काटेपुरम चौकात व्यवसायिक योगेश जगताप (Yogesh Jagtap)यांची गोळ्या घालत हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. यामध्ये पोलिसांनी गणेश मोटे व अश्विन चव्हाण या दोघांसह 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आज गणेश मोटे, अश्विन चव्हाण, महेश माने यांना पकडण्यासाठी गेलेले पोलिस आणि आरोपींमध्ये मोठी चकमक झाली.
या तिघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चकमकीत पोलिसांकडून दोन राउंड फायर करण्यात आले. या घटनेतील दोन आरोपींना यापूर्वीच सांगवी पोलिसांना पकडले आहे. अक्षय केंगले आणि गणेश ढमाले अशी त्यांची नावे आहेत.
शनिवार (दि. 18) रोजी सांगवीतील काटेपुराम चौकात सकाळी साडेदहा व्यवसायिक योगेश जगताप यांच्यावर दोन जअज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या हल्ल्यात व्यावसायिक योगेश यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी झाडलेल्या सहा गोळ्यातील दोन गोळ्या त्यांना लागल्या यात जगताप गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या फौजफाट्यासह पोलीस घटना स्थळावर हजर झाले. आरोपी यांनी जगताप यांच्यावर जुन्या भांडणाचा राग उकरून काढत हल्ला केला.
सांगवीत वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने संगनमत करुन आरोपींनी हल्ल्याचा कट रचला. घटनेच्या दरम्यान योगेश दत्त जयंती निमित्त सुरु होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पाहत असताना गणेश मोटे व अश्विन चव्हाण तेथे आले. त्यांनी ‘ योग्या तुला आता जिवंत ठेवत नाही म्हणत पिस्तूल घेऊन त्यांच्यामागे धावले, त्यांच्या हातात पिस्तूल बघून योगेश यांनी पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी तब्बल सहा गोळया झाडल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.