ZP Election 2025: नगरपरिषदेत मतांचा 'भाव' पाहून निवडणुकीपूर्वीच ZP इच्छुकांना 'घाम फुटला'

ZP Panchayat Samiti Election: भावकीने भाव देणे बंद केल्याने अनेक ठिकाणी सख्खे नातेवाईकही एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. मावळातील राजकारणात पैशाचा प्रभाव इतका वाढला की आता “खर्च नाही तर संधी नाही” अशी मानसिकता रुजताना दिसते.
ZP-PS election
ZP-PS election sarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे (पुणे) : तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायत निवडणुकीत एका मतांच्या बदल्यात तब्बल १० ते २५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे समजते. याची चर्चा सुरु असतानाच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही पैशाचा पाऊस पडण्याची चिन्हे ठळक दिसत आहेत. वाढत्या खर्चाचा अंदाज पाहून अनेक इच्छुक उमेदवारांना निवडणुकीपूर्वीच “घाम फुटला” आहे.

एकेकाळी मावळ तालुक्यातील निवडणुका कमी खर्चात, मान–पानात होते. भावकी, नातेसंबंध, गावगाडा याला काही किंमत होती.मात्र गेल्या दहा वर्षांत चित्र पूर्ण बदलले आहे.पैसा हा निवडणुकीचा मुख्य ‘निकष’ ठरू लागला. भावकीने भाव देणे बंद केल्याने अनेक ठिकाणी सख्खे नातेवाईकही एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. मावळातील राजकारणात पैशाचा प्रभाव इतका वाढला की आता “खर्च नाही तर संधी नाही” अशी मानसिकता रुजताना दिसते.

ZP-PS election
Devendra Fadnavis: शिवाजी पाटलांसाठी फडणवीस हा कोरा चेक! शक्तिपीठ महामार्ग चंदगडातून येणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

निवडणुकांमध्ये पैशाचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस

विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली खर्चाची परंपरा पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत झेपावली. अलीकडच्या निवडणुका हेच दिसते. शहरागणिक मतांचा ‘भाव’ वाढताना दिसला. काही ठिकाणी रातोरात व्यवहार झाले, तर काही ठिकाणी मतांसाठी चढाओढ झाली. जमीनीला सोन्याचा भाव; त्याचा थेट परिणाम राजकारणावर, मावळातील जमीनबाजार सध्या तापला आहे.

विशेषत:रिंगरोड प्रकल्पात अनेकांच्या जमिनी गेल्या त्या मोबदल्यात नागरिकांना कोट्यवधी रुपये मिळाले आहे. तालुक्यात पैसा मोठ्या प्रमाणावर फिरू लागला. याचा थेट परिणाम निवडणुकांवर दिसत आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या झपाट्याने वाढली असून उमेदवारी मिळवण्यासाठीच लाखोंचा खर्च करण्यात ते तयार आहेत.

प्रचारासाठी कोट्यवधींची उधळण

आर्थिक बळ नसलेले निष्ठावंत कार्यकर्ते स्पर्धेबाहेर ढकलले गेले आहेत. सहा महिन्यांपासून इच्छुकांचा ‘अदृश्य’ खर्च सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांनी मागील सहा महिन्यांपासूनच तयारी सुरू केली आहे. यासाठी उधळपट्टी सुरु आहे. घर–दार संपर्क, मेळावे, बैठकांची मालिका, महिलासाठी देवदर्शन, वाढदिवस, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थिती,मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगळे ‘फॉर्म्युले’ सोशल मीडियावर मोठा खर्च उमेदवारांनी प्रचाराआधीच लक्षावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

आगामी निवडणुकीत पैशाचा जोरदार पाऊस?

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत मतांच्या बदल्यात १० ते २५ हजार रुपयांचा दर अनुभवास आला असल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत हा आकडा अजून वाढू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.यामुळे, प्रत्येक इच्छुकाचे गणित कोलमडले आहे. घरचा खर्च, प्रचाराचा खर्च, ‘शेवटच्या टप्प्यातील खर्च’ अशा तिहेरी तडाख्याने बजेट फुगले आहे. काही इच्छुक उमेदवारांनी तर निवडणूक येण्याआधीच माघार घेण्याची चर्चा सुरू केली आहे.

  • तळेगाव दाभाडे : मताला अंदाजे १०,०००

  • लोणावळा : १५,००० ते २०,०००

  • वडगाव : तब्बल २०,००० ते २५,०००

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com