रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना 100 कोटींची तातडीची मदत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागरिकांना विश्‍वासात घेऊन पंचनामे करामदतकार्य करताना प्राधान्य ठरवा, लोकांना विश्‍वासात घ्या. कोणताही गैरसमज पसरू देऊ नका. पंचनामे तातडीने करून पाठवा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला 75 कोटी रुपये, सिंधुदुर्गला 25 कोटी रुपये जाहीर केले आहेत.

ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचा आढावा घेऊन, निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले.

सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यास नुकतीच मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसानभरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून, नवीन सुधारित निकष कसे असावेत. त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी म्हणजे निर्णय घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

निसर्गसारख्या गंभीर संकटात सरकार  कोकणवासीयांच्या सोबत आहे. लवकरात लवकर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. रत्नागिरीचे पालकमंत्री ऍड. अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यात सहभागी झाले होते. ते त्या-त्या ठिकाणाहून या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. यावेळी पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पालघरमधील नुकसानीची माहिती दिली.

नागरिकांना विश्‍वासात घेऊन पंचनामे करा
मदतकार्य करताना प्राधान्य ठरवा, लोकांना विश्‍वासात घ्या. कोणताही गैरसमज पसरू देऊ नका. पंचनामे तातडीने करून पाठवा, जिथे जनजीवन ठप्प झालेले असेल तिथे दळणवळण तातडीने सुरू करा. मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून, तातडीने वीज पुरवठा सुरू करावा. अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी. छोटे दुकानदार, व्यावसायिक, मूर्तिकार, मच्छीमार यांना तातडीने मदत करा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com