अमरावतीतही महानगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू 

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक एकसदस्य पद्धतीने होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आगामी सव्वावर्षाने अमरावती महापालिकेच्या निवडणुकाही याच पद्धतीने होणार आहेत, हे स्पष्ट आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Amravati-Municipal-Corporation
Amravati-Municipal-Corporation

अमरावती : महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार असली तरी राजकीय पक्षांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. याचे कारण पुढील महिन्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जनगणना अद्याप झालेली नाही, पण पुढील वर्षी अपेक्षित आहे. लोकसंख्या वाढीवर सदस्यसंख्या अवलंबून राहणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष, अशीच निवडणूक रंगण्याची शक्यता अधिक आहे.  

1983 मध्ये स्थापन झालेल्या अमरावती महापालिकेची पहिली सार्वजनिक निवडणूक 1992 ला एकसदस्यीय पद्धतीने झाली होती. त्यावेळी 78 सदस्य होते. दुसऱ्या निवडणुकीत 73 सदस्यांसाठी निवडणूक झाली व तीसुद्धा एकसदस्यीय पद्धतीने झाली. 2002 मधील तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका झाल्या व सदस्यसंख्या 81 झाली. त्यानंतर पुन्हा चौथ्या पंचवार्षिकमध्ये 2007 मध्ये एक सदस्य पद्धतीने झालेल्या निवडणुकीतही 81 सदस्यसंख्या कायम राहिली. 2011 च्या जनगणनेनंतर मात्र महापालिकेतील सदस्यांची संख्या सहाने वाढून 87 झाली. 

पाचव्या पंचवार्षिकमध्ये 2012 ची निवडणूक दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यात आली. या वेळी 43 प्रभाग तयार करण्यात आले होते. त्यानंतर 2017 मधील निवडणूक युती सरकारने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेतली. 22 प्रभागांतून चार व एका प्रभागातून तीन, असे 87 नगरसेवक निवडून आले. बहूसदस्यीय प्रभाग पद्धतीचा लाभ भाजपला अधिक झाला. बहूमताने सत्ता आली. बहूसदस्यीय प्रभाग पद्धतीत भाजपला होणारा लाभ लक्षात घेत महाविकास आघाडीने आता मुंबई वगळता उर्वरित महापालिकांच्या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने घेण्याचे विधेयक संमत केले आहे. 

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक एकसदस्य पद्धतीने होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आगामी सव्वावर्षाने अमरावती महापालिकेच्या निवडणुकाही याच पद्धतीने होणार आहेत, हे स्पष्ट आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुका 2011 च्या जनगणनेनुसार होतील का? हे स्पष्ट नाही. पुढील वर्षात जनगणना होणे अपेक्षित असले तरी त्याचा प्राथमिक डेटा उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यावर सदस्यसंख्या कमी अधिक अवलंबिली आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com