अनंत गुढे म्हणाले, आशिष जयस्वाल हा प्रामाणिक व कट्टर शिवसैनिक, मंत्रिपद मिळेल...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कुठल्याही प्रशासकीय आणि संविधानिक कामाचा अनुभव नसतानासुद्धा त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे. खासकरून कोरोनाच्या काळात त्यांनी महाराष्ट्रासाठी चांगले निर्णय घेतले. त्यामुळे भाजपचे पोट आता जास्तच दुखू लागले आहे.
Anant Gudhe - Ashish Jaiswal
Anant Gudhe - Ashish Jaiswal
Published on
Updated on

नागपूर : आमदार आशिष जयस्वाल MLA Ashish Jaiswal हा कट्टर शिवसैनिक आहे. पक्षाशी प्रामाणिक आहे. He is honest with party अधिकृत तिकीट मिळालेली नसतानाही ते आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर आजही पक्षासोबत आहेत. आमचा पक्ष म्हणजे आमचे घर आहे आणि आपल्या घरात प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यांनीही ती व्यक्त केली आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारात पक्षनेतृत्व आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray त्यांचा विचार नक्की करतील, असा विश्‍वास अमरावतीचे माजी खासदार अनंत गुढे former MP Anant Gudhe यांनी व्यक्त केला. 

शिवसेनेचे उपनेते हिंगणघाटचे तीन वेळा आमदार आणि राज्यमंत्री राहिलेले अशोक शिंदे यांनी शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल हेसुद्धा पक्षात नाराज असून वेगळी वाट धरण्याच्या मानसिकतेत असल्याचे बोलले जात होते. याबाबत आमदार जयस्वाल यांनी कालच मन मोकळे केले. याबाबत बोलताना गुढे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर विदर्भात शिवसेनेचा एकही मंत्री नाही. आपले सरकार असताना पक्षाच्या विस्तारासाठी मंत्रिपदाची गरजही त्यांनी कबूल केली आणि पक्षनेतृत्व याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असेही सांगितले. आशिष जयस्वालांना सध्याही राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्यामध्ये जयस्वाल यांचा नंबर लागेल, असेही ते म्हणाले. 

आमची आई आहे शिवसेना…
आमची पहिली आई जन्मदात्री, दुसरी धरणीमाता आणि तिसरी आई म्हणजे शिवसेना आहे. जो खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तो पक्ष सोडून जायचा विचारही करू शकत नाही. आपल्या आईला सोडून कुणी जात नाही. त्यामुळे गेले ते शिवसैनिक नव्हतेच, असे आम्ही मानतो. असे किती आले आणि किती गेले, पण शिवसेना आपला भगवा अभिमानाने आजही फडकवत आहे. आमच्या आईशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळतीलच, असे अनंत गुढे म्हणाले. 

म्हणूनच ते १०६ आमदार घेऊन घरी बसलेत...
माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्यावर जे काही आरोप लावण्यात आले होते, ते निराधार निघाले. आरोप सिद्ध झाले नाही आणि कुणाचीही तक्रार नाही. पण त्यांच्या विषयात भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने तुटून पडला. त्यामुळे नेतृत्वाला तो निर्णय घ्यावा लागला. भाजपची ती सवयच आहे की, तुटून पडायचे. त्यांच्या या सवयीमुळेच ते १०६ आमदार घेऊनही आज घरी बसलेले आहेत. सरकार पाडतो, सरकार पडणार, असे म्हणता म्हणता दोन वर्ष पूर्णही होत आले आहेत. पण त्यांचे ईप्सित काही साध्य झाले नाही, असे गुढे म्हणाले. 

मुख्यमंत्री उत्तम काम करताहेत…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कुठल्याही प्रशासकीय आणि संविधानिक कामाचा अनुभव नसतानासुद्धा त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे. खासकरून कोरोनाच्या काळात त्यांनी महाराष्ट्रासाठी चांगले निर्णय घेतले. त्यामुळे भाजपचे पोट आता जास्तच दुखू लागले आहे. आता केवळ वाट पाहणेच भाजपच्या नशिबी आहे. त्यामुळे आता त्यांनी नसती उठाठेव करू नये, असा सल्लाही अनंत गुढे यांनी भाजप नेत्यांना दिला. 
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com