नेर (जि. यवतमाळ) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अनेक गमतीजमतींसह चुरस आणि खुन्नसही बघायला मिळाली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान नेर तालुक्यातील धनज येथे सत्तांतर होताच गावातील इस्त्राइल पठाण यांनी निवडून आलेल्या मिर्झा नासीर बेग यांचा चक्क दुधाने अभिषेक करत जल्लोष साजरा केला. हे दृष्य बघून लोकांना अभिनेता अनिल कपूरच्या नायक या सिनेमाची आठवण झाली.
२००१ मध्ये प्रदर्शित झालेना नायक सिनेमा राजकारणावर आधारित आहे. सिनेमात विरोधकांनी पाठवलेल्या गुंडांच्या तावडीतून जीव वाचवून आलेला नायक अनिल कपूरचा एक दुधवाला दुधाने अभिषेक करतो. धनजमध्ये घडलेल्या या प्रसंगामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांना धूळ चारून विजयी झालेले मिर्झा नासीर बेग यांचा दुषाभिषेक इस्त्राईल पठाण यांनी केला. विशेष म्हणजे या प्रसंगातील पठाण हेसुद्धा दुधवाला आहेत. या प्रसंगाला नायक सिनेमाची जोड देऊन हा दुधाभिषेक पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.
धनज हा काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेसचे सुरेश सहारे यांनी आजपर्यंत अबाधित ठेवला. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेने अनेकदा प्रयत्न केले, परंतु हे सर्व प्रयत्न असफल ठरले. मात्र अलीकडच्या काळात पालकमंत्री संजय राठोड यांनी धनज देवस्थान व पंचक्रोशीत मोठा विकास साधल्यामुळे धनज येथे सत्तापरिवर्तन झाले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनोज नाल्हे यांनी या ठिकाणी विशेष लक्ष दिले. काँग्रेसचा हा बालेकिल्ला सर्व जाती धर्माच्या तरुणाईने सुरुंग लावूत उध्वस्त केला. याठिकाणी नऊच्या नऊ जागा शिवसेनेने जिंकत भगवा फडकवला.
धनज हे गाव जाती-धर्माच्या पलीकडचे सर्वधर्मसमभावाच्या मूळ शिकवणीच्या पायावर घट्ट आहे. श्री संत फकिरजी महाराजांचा वारसा येथील सर्व धर्मीय उरात तेवून आहेत. याठिकाणी वार्ड क्रमांक १ हा मुस्लिमबहुल आहे. या ठिकाणी अजूनही शिवसेनेला आपली जागा करता आली नव्हती. मात्र या निवडणुकीत शिवसेनेने हा वार्ड काबीज केला. गावातील दूध विक्रीचा व्यवसाय करणारे इस्त्राइल रसूल खान पठाण यांनी नासिर बेग मिर्झा यांच्या विजयासाठी प्रण बांधला होता. या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्यास त्याचा दुधाने अभिषेक करीन, अशी त्यांनी शपथ घेतली होती.
या वार्डातील मिर्झा नासिर बेग ३४७ मते घेऊन विजयी झाले. ही वार्ता कानी पडताच नेर येथील माणिकवाडा रोडवर विजयी उमेदवाराचा दुधाने अभिषेक करून जल्लोष करण्यात आला.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.