अशोक शिंदे म्हणाले, घरी परत आल्यासारखे वाटत आहे...

अशोक शिंदे यांनी 13 जुलै रोजी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसचा हात धरला होता. यावेळी त्यांनी केलेला प्रवेश अधिकृत नसल्याने पक्षाकडून कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner
Published on
Updated on

वर्धा : हिंगणघाटचे माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते राहिलेले अशोक शिंदे Former MLA Ashok Shinde यांनी दोन आठवड्यांपूर्वीच कॉंग्रेसमध्ये Congress प्रवेश केला होता. पण त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली नव्हती. पक्षाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर आज मुंबई येथील टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्यात आली. कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर आपल्या घरी परतल्यासारखे वाटत आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले. 

नाना पटोले यांनी त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा आज केली. त्यानंतर शिंदे म्हणाले, पूर्वी ज्या पक्षात होतो त्या पक्षात प्रामाणिक काम केले. आता असलेल्या पक्षातही त्याच पद्धतीने काम करू. काँग्रेस हा आपला वडिलोपार्जित पक्ष आहे. त्यामुळे घरी आल्याचीच भावना मनात आहे. पक्षाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन आज प्रवेश अधिकृत झाला. आता वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात कॉंग्रेसला वाढवायचे आहे. आपले सर्व जुने हाडाचे कार्यकर्ते आजही सोबत आहेत. त्यामुळे यापुढेही पूर्वीच्याच जोशाने काम करणार आहो, असेही शिंदे म्हणाले. 
 

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, वसीम खान यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अशोक शिंदे यांनी 13 जुलै रोजी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसचा हात धरला होता. यावेळी त्यांनी केलेला प्रवेश अधिकृत नसल्याने पक्षाकडून कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती. आता त्यांचा प्रवेश अधिकृत झाल्याने त्यांच्यावर पक्ष विस्तारात सहभागी होण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे अशोक शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा : ...तर रविकांत तुपकर मंत्रालयात आणून टाकतील मेलेली जनावरे !
 
ठिळक भवनात काँग्रसचे राज्यातील जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. त्यांच्याकडून सध्या सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. सोबतच बूथ विकासाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वर्ध्याचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांची उपस्थिती होती. त्यांनीही अशोक शिंदेंच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेसला लाभ होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. 
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com