शिवसेनेच्या महापौरांसोबत काँग्रेसचा उपमहापौर! 'भगव्या' युती सत्तेचा इतिहास होणार

आठवडाभरापूर्वी भाजपच्या विजय औताडे यांनी औरंगाबादच्या उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी नव्या उपमहापौर निवडीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे केवळ तीन महिन्यांसाठी औरंगाबाद शहराला नवा उपमहापौर मिळणार आहे.
Aurangabad Mayor Election on 31st December
Aurangabad Mayor Election on 31st December

औरंगाबाद : राज्यातील नव्या सत्ता समीकरणानंतर औरंगाबाद शहरातही तब्बल २७ वर्षानंतर शिवसेनेसोबत भाजपऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेतले सोबती म्हणून दिसणार आहेत. येत्या ३१ डिसेंबर रोजी उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असून महाराष्ट्र विकास आघाडीचे घटक म्हणून शिवसेनेचे सर्व नगरसेवक काँग्रेसच्या उमेदवाराला मतदार करणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. 

आठवडाभरापूर्वी भाजपच्या विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी नव्या उपमहापौर निवडीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे केवळ तीन महिन्यांसाठी औरंगाबाद शहराला नवा उपमहापौर मिळणार आहे. एप्रिल २०२० मध्ये औरंगाबाद महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तत्पूर्वीच राज्याप्रमाणे औरंगाबाद शहरातही भाजपने शिवसेनेची साथ सोडून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली होती. 'त्या' योजनेच्या कामाला निवडणुकीचा अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेऊन तात्काळ कामे सुरुवात करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, निवडणूक झाल्यानंतर राज्यातील सत्ता बदलामुळे या पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. 

ही योजना भाजप सरकारने आणली होती, त्या योजनेला शिवसेनेच्या सरकारने स्थगिती दिली, असा आरोप करीत भाजप नेत्यांनी महापालिका सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

या आरोपानंतर शिवसेनेकडूनही या योजनेला स्थगिती होती, असे सांगण्यात आले होते. उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिल्यानंतर लागलीच महानगरपालिकेत असलेल्या युतीतून भाजप बाहेर पडल्याचा निर्णयही भाजप नेत्यांनी घेतला. त्यामुळे विजय औताडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदाची निवडणूक ३१ डिसेंबर रोजी घ्याव्यात असा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी नवे महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी विभागीय आयुक्तांकडे पत्र पाठवून विचारणा केली होती. 

३१ डिसेंबर २०१९ रोजी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम आज दिवसभरात महापालिकेकडून तयार केला जाणार आहे. २७ डिसेंबरपासून अर्ज दाखल करणे, मागे घेणे या प्रक्रियेला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीच्या महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसणार आहे. भगवे फेटे आणि भगव्या झेंड्याच्या रंगावरून सातत्याने राजकारण होत असलेल्या महापालिकेत या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत कोणते कोणते रंग पाहायला मिळतील, याची उत्सुकता औरंगाबाद शहरातील नागरिकांना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com