मद्यविक्री बंदीने पार्ट्यांना लागला लगाम

  मद्यविक्री बंदीने पार्ट्यांना लागला लगाम
Published on
Updated on

नाशिक, ता. 20 - दुष्काळी तालुका अन् महामार्गावरचे गाव म्हणजे परिसरातील राजकारणाचे केंद्र. नेत्यांचा राबता. सायंकाळ होताच या गावांतील ढाबे, हाॅटेल्स अन् नेत्यांचे मळे म्हणजे ग्रामीण राजकारणाची सूत्रे हलविली जातात. मात्र महामार्गावरील दारु दुकाने बंद झाल्याने त्याचा परिणाम राजकारणावरही झाला आहे. दुकानबंदीने या राजकीय चर्चांनाही ओहोटी लागली आहे. 


 रोजच्या रटाळवाण्या दैनदिनीतून कामाचा ताण थोडासा हलका व्हावा यासाठी अनेक कार्यकर्ते विविध गट, नेत्यांचे राजकारण तापवत असतात. त्याला चालना देत असतात. सायंकाळ होताच अनेक प्रतिस्पर्धीही त्यानिमित्ताने एकत्र येतात. मात्र सध्या सिन्नर, निफाड, देवळा, चांदवड, येवला, मालेगाव या तालुक्यांतील मुंबई आग्रा, औरंगाबाद, पुणे या महामाागर्लगतच्या दारु दुकाने, मद्म परवाने असलेले ढाबे, हाॅटेल्स बंद करावी लागली. याील बुहतांश ढाबे राजकीय नेते, लोकप्रतिनिधींशी संबधीत असल्याने त्यांचा व्यवसाय अन्् राजकारण दोन्ही एेन उन्हाळ्यात आटले आहे. नेत्यांचे दौरेही कमी झाले आहेत.


दिवसभराच्या तंतानावातून मिळणारी क्षणभराची मुक्तता आणि उरलाच वेळ तर थोड्या गप्पाही.अशी सुरेख मैफल आता सहजासहजी पाहणे जवळजवळ दुरापास्तच होणार आहे. हायवेपासून पाचशे मीटरच्या अंतरापर्यंत मद्यपानास शासनाने बंदी घातल्यानंतर सगळीकडे मद्यविक्री थंडावली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अगदी खेड्यापाड्यातूनही मद्यविक्रीला चांगलाच लगाम बसल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने अंमलबजावणीच्या धोरणानतर मद्यविक्रीत्यांचे धाबे चांगलेच दणाणले असून,यापूर्वी होणारी राजरोस विक्री थंडावली आहे मात्र,यांच्या बिच्चारा तळीराम चांगलाच सैरभैर झाल्याचे चित्र आहे. शरीराला लागलेली सवय (व्यसन) जाता जात नाही.त्यामुळे यावरही त्यांनी उतारा (?) शोधला आहे. हा थोडा फिरण्याचा त्रास तर होतो,मात्र कष्टाशिवाय फळ नाही हे त्यांनाही चांगलेच ठाऊक आहेच की.शेवटी दगडातही देव शोधण्याची आपली संस्कृती. त्यामुळे तहान भागविण्यासाठी थोडी पायपीट केली तर काय बिघडेल ? अशा त-हेत-हेच्या चचार्ही रंगल्या आहेत. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com