औसा ः सध्या कॉंग्रेसमध्ये स्वबळाचे वारे जोरात वाहत आहे. यावर आम्ही काही बोलणे योग्य नाही. मनात काहीही असले तरी तुम्हाला आणि आम्हाला बरोबरच जायचे आहे. तु्म्ही कोठेही जाऊ नका, आमच्या सोबतच रहा, अशी साद राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काॅंग्रेसला घातली. (Basavaraj Patil said, Jayantrao, you are Dharmendra in politics, people's love and faith in you) तर जयंत पाटील हे राजकारणातील धर्मेंद आहेत, त्यांची जनतेवर मजुबत पकड आणि विश्वास असल्याचे म्हणत त्यांची स्तुती केली.
औसा येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा काॅंग्रेसचे राज्य कार्याध्यक्ष बसवराज पाटील देखील उपस्थित होते. (Ncp State President Jayant Patil ) त्यांना पाहून नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावरून जयंत पाटलांनी बसवराज यांना चिमटा काढला. (Congress Working Commitee President Basavraj Patil) यावेळी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक महिला अध्यक्षा सक्षणा सलगर यांची उपस्थिती होती.
महामंडळांच्या नियुक्त्या करतांना आम्ही समानता बाळगली आहे. यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आमची भुमिका असुन स्वबळाचा नारा हा तुमचाच अधिक आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. यावेळी दोन नेत्यांमधील ही जुगलबंदी चांगलीच रंगली होती. कॉंग्रेस कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांना उद्देशुन आघाडीत आम्हीही तिसरे महत्वपुर्ण घटक आहोत आम्हालाही विचारात घ्या असा टोला लगावला होता.
स्वबळाचा नारा तुमचाच..
त्याला उत्तर देतांना जयंत पाटलांनी स्वबळाचा नारा तुमचाच असल्याची आठवण करुन दिल्याने औशात राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या दोन पाटलांची जुगलबंदी रंगली. यावर जयंत पाटील तुम्ही चित्रपटातील स्पर्धेत नसलेल्या सुपरस्टार धर्मेद्र प्रमाणे आहात, तुमची राजकाराणातील पकड मजबुत आहे, असे म्हणत जयंत पाटलांची स्तुती केली.
यावेळी बोलतांना बसवराज पाटील यांनी थोडी नाराजी व्यक्त करत आघाडी सरकारमध्ये आमचाही महत्वपूर्ण सहभाग असल्याने केवळ सेना-राष्ट्रवादीचे नाव घेण्यापेक्षा आमचेही नाव घ्या. सरकारमध्ये आम्हीही आहोत याची जाणीव जयंत पाटलांना आपल्या भाषणातून करुन दिली.
यावर जयंत पाटलांनी खुमासदार उत्तर देत राज्यात शिवसेना हा एक नंबरचा मोठा पक्ष, त्यानंतर दोन नंबरवर राष्ट्रवादी तर तीन नंबरला कॉंग्रेस आहे. आघाडी असल्याने आम्ही बोलतांना समान बोलतो, मात्र आपल्याकडूनच सध्या आघाडीधर्म विसरुन स्वबळाचा नारा दिला जात असल्याची आठवण जयंत पाटलांनी बसवराज यांना करून दिली.
तुमच्या मनात काय आहे हे दिसते, पण आमच्या मनात तुमच्या बद्दल काहीच नाही, आम्हाला तुमच्या बरोबरच जाण्याची मनापासुनची ईच्छा आहे. त्यामुळे तुम्ही कोठेही जाऊ नका, आता आपण सर्व समसमान आहोत, असा चिमटा काढताच उपस्थितांनी हसून दाद दिली.
जयंत पाटलांवर जनतेचा विश्वास..
यावर गप्प बसतील ते बसवराज कसले, मग माईकचा ताबा घेत त्यांनीही जयंत पाटील यांना कधी चिमटा तर कधी त्यांची स्तुती करत कार्यक्रमात रंगत आणली. बसवराज म्हणाले, एकेकाळी चित्रपटसृष्टीत राजेश खन्ना, अमिताभ बच्चन कायमचे सुपरस्टार राहीले, किंबहुना त्यांच्यात याबद्दल स्पर्धा होती.
मात्र त्या दोघा सुपरस्टारपेक्षा वेगळे असणारे धर्मेंद्र कधीही या स्पर्धेत न राहता त्यांनी लोकांच्या मनावर असलेली पकड सुपरस्टरपेक्षाही जास्त मजबुत केली होती. राजकारणातील ईतर सुपरस्टरपेक्षा जयंत पाटील यांची ईमेज ही धर्मेंद्रसारखी असुन आपल्यावर राज्यातील जनतेचे प्रेम आणि विश्वास असल्याचे म्हटले.
आजारी असतांनाही कारखान्याच्या अत्यंत आडचणीच्या वेळेस जयंतरावांनी केलेली मदत ही न विसरण्यासारखी असल्याने त्यांच्या मदतीमुळेच किल्लारी सहकारी साखर कारखाना विठ्ठलसाईला चालवता आला, अशा भावना बसवराज पाटील यांनी व्यक्त केल्या. तर मी व बसवराज पाटील यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात एकत्रीत काम केले आहे.
विधानसभेत आम्ही दोघांनी राज्यातील आनेक महत्वाच्या विषयावर चिंतन करुन ते तडीस नेले. माझा व बसवराज पाटलांचा असलेला हा स्नेह माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी जुळवून आणला होता. तोच स्नेह आम्ही जरी वेगळ्या पक्षात काम करत असलो तरी कायम असल्याची ग्वाही जयंत पाटलांनी दिली.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.