संग्रामपुर बाजार समितीच्या सभापतीपदावरून भाजपत अस्वस्थता

राजकीय पटलावर आपली पाळेमुळे घट्ट करण्याच्या प्रयत्नात सहकार क्षेत्रातही प्रभाव वाढविण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी रणनीती आखली आहे. मात्र, हे करीत असताना थेट विरोधी पक्षाच्या गटाचा पक्षाला टेकू घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे. संग्रामपुर बाजार समिती आणि खरेदी विक्री संस्था ह्या दोन्ही शेतकरी संस्था सहकार क्षेत्राचा राजकीय आखाडाच मानला जातात.
संग्रामपुर बाजार समितीच्या सभापतीपदावरून भाजपत अस्वस्थता

संग्रामपुर : केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाला बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्‍यातील सहकार क्षेत्रात पक्षाची पायाभरणी करताना शिवसेनेला शह देण्यासाठी विरोधी पक्षाचा टेकू घेण्याची वेळ आली आहे. संग्रामपूर बाजार समिती सभापती पदाच्या निवड प्रक्रियेत भाजपने सभापती पद मिळविले. मात्र, या राजकीय घडामोडींमुळे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत भाजपला राम राम ठोकून दुसऱ्या पक्षाशी घरोबा करण्याच्या तयारीला लागले आहेत. 

राजकीय पटलावर आपली पाळेमुळे घट्ट करण्याच्या प्रयत्नात सहकार क्षेत्रातही प्रभाव वाढविण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी रणनीती आखली आहे. मात्र, हे करीत असताना थेट विरोधी पक्षाच्या गटाचा पक्षाला टेकू घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे. संग्रामपुर बाजार समिती आणि खरेदी विक्री संस्था ह्या दोन्ही शेतकरी संस्था सहकार क्षेत्राचा राजकीय आखाडाच मानला जातात. 

आता पर्यंत जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील सहकार क्षेत्रात भाजप आणि शिवसेनेला एन्ट्री करता आली नाही. मात्र, केंद्र आणि राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता येताच संग्रामपुर मध्ये आमदार डॉ. संजय कुटे यांनी कॉंग्रेसच्या एका गटासोबत हातमिळवणी करून पक्ष विरहीत आघाडी तयार करून खरेदी विक्री संस्थेत प्रथमच सत्ता स्थापन केली. त्यानंतर बाजार समितीमध्येही राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मदतीने वर्चस्व प्रस्थापीत करून सेनेला बाजुला ठेऊन कॉंग्रेसच्या पदरात सभापती पद टाकले. त्यामुळे भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

मात्र, आमदारांनी त्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश मिळवले. तेव्हापासून भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी वाढीस लागली. बाजार समितीच्या सत्ता स्थापनेच्या गणितानुसार गेल्या महिन्यात सभापती आणि उपसभापती पदाचे राजीनामे देण्यात आले. नवीन निवड प्रक्रियेत भाजपकडून सभापती गोपाल अढाव आणि गजानन दाणे यांची नावे पुढे आली होती. मात्र, यापैकी दाणे यांचीच निवड जाहीर करण्यात आल्याने गोपाल अढाव यांचा चांगलाच हिरमोड झाला. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा अढाव यांना डावलण्यात आले होते. मात्र, ती नाराजी बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत दुर होईल, अशी अपेक्षा असलेल्या अढाव यांचा पुन्हा राजकीय गेम करण्यात आल्याने त्यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली आहे. गोपाल अढाव हे आमदार दत्तक ग्राम काकनवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून सरपंच पदाची त्यांची तिसरी टर्म आहे. आमदार कुटे यांचे विश्‍वासू म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. मात्र, सभापती पदाच्या निवडीत झालेल्या अन्यायामुळे अढाव गटात नाराजी उफाळून आल्याने त्यांनी दुसऱ्या पक्षाशी घरोबा केल्यास स्थानिक पातळीवर भाजपसाठी अडचणीचे ठरणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com