...,तर आघाडी सरकारने सत्ता सोडून राष्ट्रपती राजवट स्वीकारावी

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी (Chandrakant Patil) मंत्री आशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
 Ashok Chavan, Chandrakant Patil,

Ashok Chavan, Chandrakant Patil,

Sarkarnama

Published on
Updated on

पुणे : ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत (OBC Political Reservation) केंद्र सरकारच्या (Central Government) भूमिकेवरून काँग्रेसचे (Congress) नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलेल्या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी (Chandrakant Patil) चांगलाच समाचार घेतला आहे. राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर, महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, असे आव्हान त्यांनी चव्हाणांना दिले आहे.

<div class="paragraphs"><p> Ashok Chavan, Chandrakant Patil,</p></div>
"नाक दाबले की तोंड उघडते"; एकनाथ शिंदेंचा इशारा

चंद्रकांत पाटील म्हणाले, ओबीसी राजकीय आरक्षण गमावण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारची हलगर्जीपणा कारणीभूत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करणे व त्यासाठी मुळात एंपिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले होते. त्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने अजूनही काही प्रभावी पावले टाकलेली नाहीत. मार्च 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही आघाडी सरकारने ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा केला असता तर, आतापर्यंत हा प्रश्न सुटला असता. मात्र, आपण काहीही करायचे नाही आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलायची, असे आघाडी सरकारचे धोरण असल्याची टीका पाटलांनी केली.

<div class="paragraphs"><p> Ashok Chavan, Chandrakant Patil,</p></div>
प्रवीण दरेकर विरुद्ध नवाब मलिक अशी जुंपली की सभापतींना समज द्यावी लागली..

दरम्यान, कोरोना महासाथ, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण अशा प्रत्येक महत्त्वाच्या विषयात आघाडी सरकार स्वतः काही जबाबदारी पार पाडायचे टाळून केवळ केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहे. राज्यातील प्रश्न सोडविण्याची मुख्य जबाबदारी आघाडी सरकारची असताना त्यासाठी कोणताही पुढाकार घेताना आघाडी सरकार दिसत नाही. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून मोदी सरकारने जनतेला दिलासा दिल्यानंतर आघाडी सरकार मात्र, शक्य असून असा दिलासा देत नाही. केवळ केंद्र सरकारनेच कर कमी करून आणखी दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आघाडीचे नेते व्यक्त करतात. अशा रितीने राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायची आघाडी सरकारची अपेक्षा असेल तर, या सरकारला राज्यात सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आघाडी सरकारने सत्ता सोडून राष्ट्रपती राजवट स्वीकारावी आणि मगच केंद्र सरकारकडून प्रत्येक कामाची अपेक्षा करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com