नगर शहराला थ्री स्टार मानांकन, महापाैरांनी दिले यांना दिले श्रेय

नगर शहराला मोठे खेडे अशी बिरुदावली लावली जाते. तथापि, ती खोटी ठरवत नगरकरांनी इतिहास रचला आहे. स्वच्छतेच्या स्पर्धेत मानांकन मिळवून राज्यात मानाचा तुरा रोवला आहे.
nagar mahapalika.jpg
nagar mahapalika.jpg

नगर : केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्पर्धेत नगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले असल्याने 15 ते 25 कोटींचा निधी मिळणार आहे. हे मानांकन मिळण्याचे श्रेय महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी जिल्हाधिकारी, सर्व पक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिकांना दिले आहे. सर्वांच्या प्रयत्नाने ही कामगिरी करू शकल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नगर शहराला मोठे खेडे अशी बिरुदावली लावली जाते. तथापि, ती खोटी ठरवत नगरकरांनी इतिहास रचला आहे. स्वच्छतेच्या स्पर्धेत मानांकन मिळवून राज्यात मानाचा तुरा रोवला आहे.

स्पर्धेत सहभाग घेताना तत्कालीन महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग एक डिसेंबरला निवृत्त झाले. आयुक्‍त पदरिक्‍त झाल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिकेचा अतिरिक्‍तपदभार आला. जिल्हाधिकाऱ्यांसमोर नगर शहरातील स्वच्छतेचाच महत्त्वाचा प्रश्न होता. तथापि, त्यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्वच्छतेचे आव्हान स्विकारले. शहराला कोणत्याही परिस्थितीत बक्षिस मिळवायचे, असे ठरवून त्यांनी सर्वांना सोबत घेवून काम केले. नगर शहराने जानेवारी महिन्यामध्ये भारत स्वच्छता अभियानातील स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविला. केवळ महिनाभरात स्वच्छतेची जोरदार मोहीम राबवून बक्षिसापर्यंत मजल मारली. त्यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, मुख्य स्वच्छता निरीक्षक कुमार सारसर, प्रकल्प अधिकारी राजेंद्र मेहेत्रे, स्वच्छता अभियानाचे समन्वयक सुरेश भालसिंग यांच्यासह महापालिकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहिमेत स्वतःला झोकून दिले. 17 ते 18 तास या मोहिमेत सर्वपक्षीय नगरसेवक, महापालिका अधिकारी व कर्मचारी काम करत होते.

नगर शहरातील संघटनांनीही त्यासाठी चांगली साथ दिली. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्यासाठी विशेष सहकार्य केल्याचे महापाैर आवर्जुन सांगतात. स्वच्छतेच्या बाबतीत राजकारण होणार नाही, असा पवित्रा इतर पक्षाच्या नेत्यांनी घेतला. त्यामुळेच या पक्षिसापर्यंत महापालिका पोहचू शकली.

हा इतिहास घडला : वाकळे

सर्वांच्या सहकार्यामुळे नगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले, हा इतिहास घडला आहे. त्यासाठी सर्वांनी जीव ओतून काम केले. यापुढेही नगर शहराच्या स्वच्छतेसाठी प्राधान्यक्रम असेल. या निमित्ताने मिळणाऱ्या निधीतून शहरासाठी चांगले कामे होऊ शकतील, असे मत महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com