नंदुरबार : सरकारी अधिकारी असे नाव घेतले तरी सर्वसामान्य व्यक्ती त्यांच्यापासून चार हात दूरच राहणे पसंत करतात. परंतु जर त्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले तर त्या अधिकाऱ्याला तिच जनता मनात बसविते अगदी त्यांचा गौरवही करते. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केलेल्या कार्यामुळे नागरिकांनीच त्यांचे नाव नगराला दिले आहे.
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मे 2016 ला नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात, जुलै 2016 ला पाचोराबारी (ता. नंदुरबार) येथे ढगफुटीचा प्रकार घडला. या घटनेत गावातील अनेक घरे, संसारोपयोगी साहित्यासह वाहून गेले. चार माणसे, अनेक पशूंचे प्राण गेले. रेल्वेपुल वाहून गेला. त्यात जे शासकीय नुकसान झाले, त्यात रेल्वेचा अधिक समावेश होता. रेल्वेचे नुकसान नजीकच्या काळात भरून निघाले. मात्र ज्यांची घरे वाहून गेली, मनुष्यहानी झाली, त्यांचे काय ? असा प्रश्न उभा राहिला.
जिल्हाधिकारी कलशेट्टीं यांनी स्वत: पुढाकार घेत जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील अनेकांची मदत घेतली. स्वयंसेवी संस्थांवर पुनर्वसनाच्या देखरेखीची जबाबदारी दिली. ते स्वतः रोज या गावाला भेट देत होते. त्यातून अनेकांच्या हातून मदत पोचवत त्यांनी सर्व घरांची उभारणी केली. त्या कुटुंबांना जी शासकीय मदत मिळणार होती, त्यांना मिळवूनही दिली. त्याचबरोबर संसार उभे करून दिले. आपल्याला या अधिकाऱ्याच्या माध्यमातून देवमाणूस भेटला, असे म्हणत ज्या भागाचे नुकसान झाले अन पुनर्वसन करण्यात आले,त्या ठिकाणच्या रहिवासी कुटुंबांनी एकत्र येत आपल्या वसाहतीला "डॉ. कलशेट्टी नगर'असे नाव दिले. कर्तव्यदक्ष असलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा हा खऱ्या अर्थाने नागरिकांनी केलेला सन्मानच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.