श्रीरामपूर : काँग्रेस पक्षाचा विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक काॅंग्रेस कार्यकत्यांची आहे. देशभरात सध्या कठीण परिस्थिती निर्माण झाली असून, आता देशाला केवळ काँग्रेसचा विचार वाचवू शकतो. राज्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काॅॅंग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत असताना त्यांच्या कार्याचा देशभरात सर्वत्र आदरपुर्वक उल्लेख केला जातो. राज्यात महसूलमंत्री थोरात यांच्यामुळेच आज महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन विकासकामांना गती मिळाल्याचे, प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
येथील यशोधन कार्यालयात महसूलमंत्री थोरात यांच्या वाढदिवसानिमीत्त नुकताच काँग्रेस बळकटीकरण सप्ताहास प्रारंभ झाला. त्यावेळी कानडे बोलत होते. या वेळी काॅंग्रेसचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, जेष्ठ कार्यकर्ते अण्णा थोरात, जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, बाबासाहेब कोळसे, ॲड. समीन बागवान उपस्थित होते.
काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाच्या निमित्ताने टाकळीभान येथील भुमीहीनांचा मेळावा, बेलापूर व उक्कलगाव येथील शेतकरी मेळावा, जनतेच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे. असंघटीत कामगारांचा मेळावा, युवकांसाठी मार्गदर्शन मेळावे, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळ्यासह राज्यस्थरीय कवी संमेलन आयोजित केले जाणार आल्याचे आमदार कानडे यांनी जाहीर केले. यानिमित्ताने काॅंग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीतील शहिद शेतकरी आंदोलकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
हेही वाचा..
पोलिसांच्या मुलांसाठी राज्यात वसतिगृहे उभारावीत : जगधने
श्रीरामपूर : "अनेक वर्षांपासून मी शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असल्याने पोलिसांची मुले दुर्लक्षित असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यासाठी राज्यभरात वसतिगृहांची उभारणी करावी,'' अशी मागणी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
शहरात आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात जगधने बोलत होत्या. या वेळी पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
"पोलिसांच्या मुलांमध्ये विविध कला-गुण असून, ती बुद्धिमान असतात. मात्र, पोलिसांच्या कुटुंबात जन्माला आल्यामुळे त्यांच्यात पोलिस होण्याची मानसिकता तयार होते. त्यातून ती अनेकदा अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. आई-वडील पोलिस प्रशासनात असल्याने मुलांच्या संगोपनाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. अनेकदा मुलांची भेटही होत नाही. नगर, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या महानगरांत वसतिगृहे उभारून या मुलांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे,'' असे मीनाताई यांनी पाटील यांना सांगितले.
Edited By - Murlidhar Karale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.