कोरोनाने स्मशानातील शांतताही हिरावली, नांदेडात अंत्यसंस्कारासाठी वेटिंग

मृतदेह जाळण्यासाठी एकुण १२ मसनजाळ्या आहेत. त्यापैकी सहा जाळ्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी तर उर्वरित सहाराखीव ठेवण्यात आल्या आहेत.
Corona News nanded
Corona News nanded
Published on
Updated on

नांदेड ः जन्मापासून ते मरणापर्यंतचा प्रवास ‘पुर्तता माझ्या व्यथेची’ या कवितेतून सुरेश भट यांनी मांडला आहे. जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली या त्यांच्या ओळी आज कोरोना जागतिक महामारीने खोट्या ठरवल्या आहेत. कोरोनामुळे दररोज होणारे मृत्यू आणि त्यामुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत देखील तासनतास प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

कोरोना जागतिक महामारीने सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले आहे. देशात व राज्यात दुसरी लाट आली का? यावर चर्चा झडत असल्या तरी कोरोना संसर्गाचे प्रमाण, रुग्णांची संख्या आणि दगावणाऱ्यांची यादी रोजच्या रोज वाढतच चालली आहे. यापुर्वी अशी परिस्थिती कधीही ओढावली नव्हती. खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत रांगा लागल्या असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

नांदेडच्या गोवर्धन घाटावर सध्या असेच काहीचे चित्र दिसत आहे. स्मशानात मर्यादित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जागा व साधान सामुग्री उपलब्ध आहे. मात्र कोरोना काळात दररोज घाटावर दाखल होणाऱ्या मृतदेहांची संख्या मात्र दुप्पट-तिप्पट वाढली आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अक्षरशः तासनतास वाट पहावी लागत आहे.

मागील चार दिवसांपासून गोवर्धन घाटावरील हे दृश मन हेलावूण टाकणारे आहे. ‘वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही..!’ अशीच काहीशी स्थिती सध्या झाली असून यातून मुक्तता कधी मिळणार? हा खरा प्रश्न आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीराला घराची चौकट ओलांडण्याची देखील मुभा राहिलेली नाही. त्यामुळे रुग्णालयातून मृतदेह थेट स्मशानात घेऊन जावा लागतो.

रोज आठ ते दहा मृतदेह

मात्र, घाईगडबडीत आणल्या गेलेल्या मृतदेहाला सरणावर जाण्यासाठी देखील पाच ते सहा तास वाट बघावी लागते. कारण त्या आधीच काही मृतदेह तिथे अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत निपजीत पडलेले असतात. गोदावरी नदी काठावर असलेल्या गोवर्धनघाट या मुख्य स्मशानभूमीसह, रामघाट, मरघाट, सिडको, डंकीन अशा ठिकाणी अंत्यविधीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

परंतु त्या ठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी पुरेशा सुवीधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नेहमी गोवर्धनघाट स्मशानभूमीकडेच सर्वांचा ओढा असतो. या ठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी एकुण १२ मसनजाळ्या आहेत. त्यापैकी सहा जाळ्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसाठी तर उर्वरित सहा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

परंतु जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोबतच मृत्यूदरही वाढला आहे. मागील चार दिवसापासून जिल्ह्यात दिवसाला आठ ते दहा पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू होत आहे. या शिवाय शहराच्या इतर भागातील नागरीक देखील मृतदेह घेऊन अंत्यविधीसाठी गोवर्धन घाटावर येत आहेत. स्मशानभूमीत अंत्यविधिसाठी जागा शिल्लक नसल्याने त्यांना इतर ठिकाणच्या स्मशानभूमीत जाण्याचा सल्ला दिला जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com