कोरोना इफेक्‍ट : एका खर्ऱ्यासाठी झाली तुफान दगडफेक 

खर्रा दिला नाही, म्हणून दोन गटांत दगडफेक झाली. बोरगांव येथे चोरून खर्रा विक्री होत असल्याची माहिती लाडखेड पोलींसाना काही दिवसांपूर्वी मिळाली. यासाठी पडताळणी करण्याकरिता लाडखेड पोलिस स्टेशनचे काही कर्मचारी बोरगांव येथे पाहणी करण्यासाठी गेले. नेमके त्याचवेळी गावातील एक युवक तेथे खर्रा मागण्यासाठी आला.
Ner parsopant
Ner parsopant

नेर (जि. यवतमाळ) : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कोणती घटना केव्हा घडेल आणि कशावरुन कुणाचा, कुणाशी वाद होईल, हे सांगता येत नाही. तालुक्‍यात काल रात्री केवळ खर्ऱ्यावरुन झालेल्या वादात तुफान दगडफेक झाली. जिल्ह्यातील पानटपऱ्या बंद असल्या जरी घरून खर्रा विक्री मोठ्या प्रमाणात अजूनही चालू आहे. लॉकडाऊन मधे खर्रा शौकिनांची मोठी वाताहत होत आहे. तालुक्‍यातील बोरगाव लिंगा येथे काल रात्री "खर्रा का दिला नाही', या कारणावरून तुफान दगडफेक झाली. यात दोघे जखमी झाले. पोलीस आल्यावर तणाव निवळला आणि प्रकरण नंतर आपसांत मिटले. 

लॉकडाऊनध्ये सर्व दारू दुकाने बंद असल्याने मद्यपींकडून दारू दुकाने फोडण्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यात सर्वत्र पानटपऱ्या बंद असल्याने मद्यपींप्रमाणेच खर्रा शौकिनही अस्वस्थ झाले आहेत. काल रात्री नेर तालुक्‍यातील लाडखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरगांव लिंगा येथे खर्रा दिला नाही, म्हणून दोन गटांत दगडफेक झाली. बोरगांव येथे चोरून खर्रा विक्री होत असल्याची माहिती लाडखेड पोलींसाना काही दिवसांपूर्वी मिळाली. यासाठी पडताळणी करण्याकरिता लाडखेड पोलिस स्टेशनचे काही कर्मचारी बोरगांव येथे पाहणी करण्यासाठी गेले. नेमके त्याचवेळी गावातील एक युवक तेथे खर्रा मागण्यासाठी आला. पोलीस चौकशी करून गेल्यावर पानटपरी चालक आणि खर्रा मागणाऱ्या युवकांत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतप्त झालेल्या दोघांच्याही सहकाऱ्यांकडून दगडफेक करण्यात आली. 

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा ठाकल्याने तत्काळ पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. काही वेळानंतर तणाव शांत झाल्याने दोन्ही गटांतील युवकांनी प्रकरण आपसात मिटवले. जिल्ह्यात खर्ऱ्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न होऊन सुद्धा शौकिनांचा खर्रा सुटण्याचे नाव घेत नाहीये. यवतमाळ शहरात घरुन खर्रा विकणाऱ्या एका व्यक्तीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. सुरुवातीला कमी असणारी बाधितांची संख्या पाहता पाहता 80 च्या वर गेली. यवतमाळचा अनुभव ताजा असतानाही खर्रा शौकीन स्वतःवर नियंत्रण ठेवायला तयार नाहीत. एका खर्ऱ्यासाठी दगडफेक होत असेल, लोकं एकमेकांच्या जिवावर उठत असतील, तर कशी जिंकणार कोरोनासोबतची लढाई, असा प्रश्‍न कोरोना योध्यांना पडल्यावाचून राहणार नाही. 

खर्रा का दिला नाही, या कारणावरून बोरगावात दोन युवकांत वाद झाला होता. यामध्ये दोघांत मारहाण झाल्याने दोघे किरकोळ जखमी झाले आहे. आम्ही वेळेत पोहोचलो. त्यामुळे तणाव शांत झाला. गावातील सलोखा कायम ठेवण्यासाठी त्यांनी प्रकरण आपसात मिटवले. 
- विनय कोरेगावकर, ठाणेदार, लाडखेड.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com