लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; निलेश गायकवाडची युपीएससीत भरारी

बेंगलोर येथे 'झीनोव्ह कंन्सलटन्सी कंपनीमध्ये सहयोगी कंन्सलटन्ट म्हणून रुजू झाला. पण या मर्यादित कामातून निलेशला समाधान मिळत नव्हते, दरम्यानच्या काळातच त्याला युपीएससीच्या परीक्षा खुणावत होत्या. कुणाच्या नेतृत्वाखाली काम करण्यापेक्षा आपणच नेतृत्व करावे हा त्याचा स्वभाव असल्याने निलेशने मिशन युपीएससी हाती घेतले.
Nilesh gaikwad sucess in upsc exam news
Nilesh gaikwad sucess in upsc exam news

लातूरः दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळणाऱ्या राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांमध्ये लातूरने बाजी मारली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लातूर पॅटर्नचा आवाज घुमला. ही चर्चा सुरू असतांनाच आज जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालात लातूरच्या निलेश गायकवाडने भरारी घेत राष्ट्रीय पातळीवर ७५२ वी रॅंक मिळवली. निलेशच्या या यशाने लातूरच्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या या यशाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

लातरमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर उच्चशिक्षणासाठी निलेशने मुंबईची वाट धरली. अपार मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावत त्याने अखेर युपीएससीचे शिखर सर केलेच. निलेशेचे शालेय शिक्षण लातूरच्या केशवराज विद्यालयात झाले.

वडील श्रीकांत गायकवाड हे महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व समाजशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यामुळे घरातील शैक्षणिक वातावरण आणि वडलांचे मार्गदर्शन निलेशला वेळोवेळी मिळत गेले. शालेय शिक्षण पुर्ण झाल्यानंतर निलेशने मुंबईच्या आयआयटीमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. आणि एम.टेक. पुर्ण केले. त्यानंतर गॅलॅक्सि सरफेक्टन्स लिमिटेडमध्ये इंटर्नशिप केल्यानंतर तो बेंगलोरला गेला.

बेंगलोर येथे 'झीनोव्ह कंन्सलटन्सी कंपनीमध्ये सहयोगी कंन्सलटन्ट म्हणून रुजू झाला. पण या मर्यादित कामातून निलेशला समाधान मिळत नव्हते, दरम्यानच्या काळातच त्याला युपीएससीच्या परीक्षा खुणावत होत्या. कुणाच्या नेतृत्वाखाली काम करण्यापेक्षा आपणच नेतृत्व करावे हा त्याचा स्वभाव असल्याने निलेशने मिशन युपीएससी हाती घेतले.

विद्यार्थीदशेत निबंध, कथाकथन, वादविवाद, वक्तृत्व, चित्रकला, रंगभरण, प्रश्न मंजुषा, एकपात्री अभिनय, एनसीसी, वैज्ञानिक प्रयोग यामध्ये निलेश आवडीने सहभागी व्हायचा. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रज्ञा शोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, डॉ. होमी भाभा वैज्ञानिक परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा, स्वयं अध्ययन परीक्षा, सामान्य ज्ञान परीक्षा, गणित या विषयातील पूर्वप्रथमा, प्रथमा, द्वितीया, प्रबोध, सुबोध परीक्षा, इंग्रजी विषयातील एन्टरन्स, प्रायमरी, इंटरमेडियट,  हिंदी विषयातील नागरी बोध परीक्षा, अखिल भारतीय संस्कृत ज्ञान परीक्षा यामध्येही निलेशने यश संपादन करत आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली होती. 

निर्धारित लक्ष्य, योग्य मार्गदर्शन आणि मेहनत यश देतेच..

यश मिळवण्याठी तुमचे लक्ष्य निश्चित असले पाहिजे, त्यानंतर योग्य मार्गदर्शन व झोकून देऊन मेहनत करण्याची तुमची तयारी असेल तर यश मिळाल्या शिवाय राहात नाही. केवळ बंगला, गाडी, मान प्रतिष्ठा मिळते म्हणून युपीएससीकडे न बघता या यशातून सेवा करण्याची मिळणारी संधी, समाजाचं आपण काही देण लागतो या भावनेतून होणारे काम यालाच सर्वाधिक महत्व आहे.

युपीएससीमध्ये यश मिळवण्यासाठी सूक्ष्म नियोजन, त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास त्यासाठी योग्य प्रकारचे नियोजन देखील तितकेच महत्वाचे आहे. प्रशासकीय सेवेत रूजू होण्याचा एक महत्पूर्ण मार्ग म्हणून यूपीएससी परीक्षेकडे पाहिले जाते. पण त्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी हवी. चालू घडामोडींचे सूक्ष्म ज्ञान, सामान्य ज्ञान अपडेट असेल तर तुमचा पुढचा प्रवास सुकर होतो. त्याअनुषंगाने परीक्षेशी संबंधित संदर्भ साहित्याचा आभ्यास करणे, प्रश्नसंच सोडविण्याचा सराव करणे गरजेचे असल्याचे निलेश गायकवाड याने सांगितले.

Edited By: Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com