राष्ट्रवादीच्या नुकसानीला स्वकीयच जबाबदार : दादा कळमकर

   राष्ट्रवादीच्या नुकसानीला स्वकीयच जबाबदार : दादा कळमकर
Published on
Updated on

नगर :  "" महापौर, उपमहापौर निवडीत भाजपसोबत राष्ट्रवादीने अभद्र युती करून महापौर व उपमहापौर भाजपचा केला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नुकसान झाले, त्याला स्वकियच कारणीभूत आहेत,'' असा घरचा आहेर राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरमधील ज्येष्ठ नेते माजी आमदार दादा कळमकर यांनी दिला. पत्रकार परिषदेत बोलताना कळमकर यांनी आपला व भाजपचा काहीही संबंध नसताना माझ्या बदनामीचे षडयंत्र झाले, असे स्पष्ट केले. 

ते म्हणाले, "" महापौर निवडीच्या दरम्यान राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या घडामोडींमध्ये माझा काहीही संबंध नाही. या निवडीच्या वेळी भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक एकाच गाडीतून जात असल्याचे मला ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा फोन आला होता त्यातून कळले. त्यानंतर मला या अभद्र युतीबाबत कुणकुण लागली. भाजपशी युती करू नये, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते, तरीही स्थानिक नेतृत्त्वाने पक्षादेश डावलून भाजपला मदत केली. हे मलाही मान्य नाही. या घटनेमुळे राष्ट्रवादीचे नुकसान झाले असून, संबंधितांवर वरिष्ठ मंडळी कारवाई करणार आहे."" 

पक्षाने सांगितल्यास लोकसभा लढवू 
लोकसभा लढविण्याबाबत अद्याप काहीही निर्णय झाला नाही. परंतु पक्षाने सांगितल्यास निवडणूक लढवू, असे सांगताना दादा कळमकर म्हणाले, ""पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीत माझ्याबरोबरच इतर दोन नेत्यांची नावे चर्चेत होती. पवार यांनीच तीन नावे समोर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे माझे नाव उमेदवारीबाबत जोडले गेले. परंतु पक्ष सांगेल, तसा निर्णय होईल. पक्ष देईल त्या उमेदवाराचा मी प्रचार करील,"" असे कळमकर म्हणाले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com