पक्षप्रमुखांचा आदेश काय असतो, हे मला समजले; सोळंके-जाधव यांच्यात दिलजमाई..

सोळंके यांनी अप्पासाहेब जाधवांची निवड रद्द न केल्यास थेट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी (शिवतीर्थावर) आत्मदहन करण्याचा इशाराच पक्षाप्रमुखांना दिला होता.
Beed District Shivsena Political News
Beed District Shivsena Political News
Published on
Updated on

माजलगाव : राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे माजलगाव येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मारहाण प्रकरणावरून सिद्ध झाले. ज्या शहर प्रामुख्याने नवनिर्वाचित जिल्हाप्रमुखाच्या निवडीचा निषेध केल्याच्या कारणावरून त्याला भर रस्त्यात पट्ट्याने मारहाण झालीी होती. (Dispute over Beed district chief post settled, reconciliation between Solanke and Jadhav ) जिल्हाप्रमुख बदला अन्यथा शिवतीर्थावर येऊन आत्मदहन करतो असा इशारा दिला होता, त्याच शहर प्रमुख धनंजय उर्फ पापा सोळंके यांनी आता जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काम करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

राज्यभरात गाजलेल्या बीड शिवसेना जिल्हाप्रमुखाबद्दलचा वाद मिटवण्यात वरिष्ठ नेत्यांना अखेर यश आले आहे. सोळंके यांनी या संदर्भात पत्रक आणि सोशल मिडियावर व्हिडिओ प्रसिध्द करत आपले बंडाचे निशाण गुंडाळून ठेवले आहे. (Beed Shivsena Chief)  आता या दोन्ही शिवेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये "दिलजमाई" झाली आहे. (Shivsena Leader Chandrakant Khaire)  या सर्व प्रकरणावरून "याचसाठी का; केला होता का अट्टाहास" आशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

शिवसेनेने मागील आठवड्यात बीड जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुखाची खांदेपालट करून सचिन मुळूक यांच्याजागी माजलगावचे तालुकाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची निवड केली. त्याचदिवशी शहर प्रमुख धनंजय उर्फ पापा सोळंके यांनी शिवाजी महाराज चौकात येऊन या निवडीचा जाहीर निषेध व्यक्त केला होता.

दोन दिवसानंतर नवनिर्वाचित जिल्हा प्रमुखांच्या आगमनानिमित्त शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत पुन्हा पापा सोळंके यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाप्रमुखांच्या अंगावर ऑइल टाकण्याच्या प्रयत्न केल्याचा आरोप अप्पासाहेब जाधव यांनी केला. या प्रकरणावरून ८ ते १० शिवसैनिकांनी भर रस्त्यात पापा सोळंके यांना काठी, बेल्टने मारहाण केली.

याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अन शिवसेना पदाधिकाऱ्यांचे हे मारहाण प्रकरण राज्यभर गाजले. यावेळी पापा सोळंके यांनी अप्पासाहेब जाधव यांची निवड संपर्क प्रमुखांनी कशा पद्धतीने केली याचा खुलासाही मीडियावर केला होता. एवढे प्रकरण होऊनही पापा सोळंके यांनी अप्पासाहेब जाधवांची निवड रद्द न केल्यास थेट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी (शिवतीर्थावर) आत्मदहन करण्याचा इशाराच पक्षाप्रमुखांना दिला होता.

त्यामुळे आता जिल्हाप्रमुखांची निवड रद्द होणार, की मग पक्षशिस्त मोडली म्हणून शहर प्रमुखांवर कारवाई होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.  परंतु वरिष्ठ नेत्यांनी हे प्रकरण संयमाने हाताळत दोघांमध्ये दिलजमाई घडवून आणली.  आता दोघेही हातात हात घालून शिवसेना वाढीसाठी काम करणार असल्याचे पापा सोळंके यांनी सांगितले.  तर झालेल्या मारहाण प्रकारणाबद्दल जिल्हा प्रमुखांनीही दिलगिरी व्यक्त केली. 

माफी, दिलगिरी अन् दिलजमाई

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी वरिष्ठांच्या अधिकारात पक्षाची कार्यपद्धती समजावून सांगितली. माझ्याकडून निवडीच्या निषेधाचा जो काही प्रकार झाला तो गैरसमजातून झाला, तसेच संपूर्ण प्रमुखबद्दल जे काही बोललो ते रागाच्या भरात बोललो, त्याबद्दल जाहीर माफी मागतो. यापुढे अप्पासाहेब जाधव यांच्या सोबत जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी एकदिलाने काम करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक शिवसेना शहरप्रमुख धनंजय उर्फ पापा सोळंके यांनी काढले आहे.

तर माजलगाव मध्ये शहरप्रमुख धनंजय उर्फ पापा सोळंके यांना शिवसैनिकांकडून झालेली मारहाण हा प्रकार चुकीचा होता. याबद्द्ल दिलगिरी व्यक्त करतो  यापुढे पापा सोळंके यांच्या साथीने माजलगावात शिवसेना वाढीसाठी काम करू. असे  नूतन जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com