‘दो हंसो का जोडा‘, विलासरावांच्या शेजारी उभारणार गोपीनाथ मुंडेंचा पुतळा..

राजकारणात या दोघांनीही मोठी उंची गाठली होती. आमदार ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दिल्लीत केंद्रीय मंत्री होत विलासराव देशमुख यांनी त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर दोन्ही कडची हवा अनुभवली. तर गोपीनाथ मुंडेचा प्रवासही असाच होता. युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे पुढे मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले.
let vilasrao and gopinath munde statu news
let vilasrao and gopinath munde statu news
Published on
Updated on

लातूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दो हंसो का जोडा‘ अशी ज्यांची ओळख आहे, ते दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे आता लातुरात पुतळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहेत. वेगवेगळ्या पक्षात, प्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे पक्के मित्र म्हणून हे दोघेही परिचित होते. अगदी विद्यार्थी दशेपासून ते महाविद्यालयीन जीवनात देशमुख-मुंडे जोडीचे खुमासदार किस्से राजकारणात अजूनही ऐकवले जातात. अशा या मित्रांना आता पुतळ्याच्या रुपातही एकत्र आणण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात देशमुख यांच्या शेजारीच मुंडे यांचा पुतळा उभारण्यात येणार असून तसा सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.
  
महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचे किस्से त्यांच्या पश्चात देखील चर्चिले जातात. हे दोघे एका व्यासपीठावर येणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांना एक पर्वणीच असायची. अगदी ग्रामपंचायतीपासून या दोघांच्या राजकारणाला सुरूवात झाली असली तरी त्यांची मैत्री मात्र त्याही आधीची म्हणजे महाविद्यालयापासूनची होती. दोघे पुण्याला शिकायला असल्यामुळे त्या काळातील गंमतीजमती हे दोघे एकत्र आल्यानंतर आपल्या भाषणातून सांगायचे.
 
राजकारणात या दोघांनीही मोठी उंची गाठली होती. आमदार ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दिल्लीत केंद्रीय मंत्री होत विलासराव देशमुख यांनी त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर दोन्ही कडची हवा अनुभवली. तर गोपीनाथ मुंडेचा प्रवासही असाच होता. युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे पुढे मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले. दोघेही नेहमी विरोधी पक्षात राहीले, पण पक्ष त्यांच्या मैत्रीच्या आड कधी आलाच नाही. पण या दोघांची खऱ्याखुऱ्या आयुष्यातील एक्झीटसुध्दा मनाला चटका लावणारी ठरली होती.

आता दोघेही हयात नाहीत, पण त्यांच्या निधनानंतरही त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न लातूर जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेतील विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी मुंडे यांचा पुतळा उभारून या दोघांच्या मैत्रीचा धागा अधिक घट्ट करण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. मंगळवारी सर्वसाधारण सभेत माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी हा ठराव मांडला. या पुतळ्यासाठी साठ लाख रूपये खर्च येणार असून राजकारणात कटुता वाढू नये या हेतूने तो उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणातील नव्या पिढीला या दोन मित्रांच्या पुतळ्यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.


 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com