डॉक्टर झाले आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्याशिवाय माघार नाही !

आज यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यवतमाळ येथे येत आहेत. त्यांच्यासोबत चर्चेनंतर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना दरम्यान हा संप केला गेल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.
Yavatmal Collector Office
Yavatmal Collector Office
Published on
Updated on

यवतमाळ : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील डॉक्टरांनी काम बंद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावलेले डॉक्टर्स आता अधिक आक्रमक झालेले आहेत. जोपर्यंत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना येथून हटवत नाही, तोपर्यंत काम सुरू करणार नाही, असा पवित्रा वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी घेतला आहे. त्यांना विविध २५ संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्याशिवाय दुसरा पर्याय आहे, असे दिसत नाही. 

वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंह यांनी चर्चा केली. पण ही चर्चा निष्फळ ठरली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन अद्यापही थांबण्याच्या स्थितीत नाही आहे. मध्यस्थीसाठी आलेल्या विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांच्यासोबतची बैठकही बारगळली. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांची जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. उलट आता राज्यभर त्याचे पडसाद उमटतील, अशी रोखठोक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे . 

या आंदोलनकर्त्यांना विविध २५ संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान यवतमाळचे जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ जारी केला आहे. आंदोलक वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चेस तयार आहे, असे त्यांनी यात सांगितले आहे. दरम्यान आज यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यवतमाळ येथे येत आहेत. त्यांच्यासोबत चर्चेनंतर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना दरम्यान हा संप केला गेल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. यामुळे लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.    (Edited By : Atul Mehere) 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com