नेवासे : नगर आणि नाशिकचं पाणी मराठवाड्याला मिळणार का यावरून अनेकदा महाराष्ट्राचं राजकारण पेटलं होतं. राजकारण आणि नद्या-धरणे तसे हे भिन्न विषय. त्यांचा परस्परांशी संबंध येऊ शकतो, असे कदाचित वाटणारही नाही, पण या नद्या व धरणांच्या पाण्यावरील हक्कावरून अनेक वेळा वाद, संघर्ष निर्माण झाले आहेत. निवडणुका आल्या किंवा दुष्काळ आला की या वादाला धार चढते. याचा अनुभव २०१८ मध्ये मुळा व भंडारदरा धरणाच्या हक्काच्या पाण्यावरून नगर व मराठवाड्याचा वाद सर्वांनी अनुभवला.
नगर जिल्ह्यातील एक अभ्यासू, सामाजिक जाण व भान असणारे, राजकीय, सामाजिक, कृषी, उद्योग, सहकार व जलसिंचन या क्षेत्रात भरीव योगदान देणारे ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्याशी 'पाणी प्रश्नांवर' केलेली बातचीत.
पाण्याची प्रादेशिक विषमता दूर होईल
प्रादेशिक विषमता दूर करण्यासाठी अरबी समुद्रात वाया जाणारे पाणी नद्याजोड करून गोदावरी खोऱ्यात आणून तूट भरून काढता येईल. पावसाची विषमता बघता कुठे महापूर तर कुठे दुष्काळ अशी परिस्थितीत आहे. तानसा व वैतरणा या पश्चिम वाहिनी नद्या वळवून त्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात सोडल्यास नाशिक, नगर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना लाभ होईल. शासनाचा पिण्याचे पाणी टँकरने पुरविण्याचा होणार कोट्यवधींचा खर्च कमी होईल. व शेती सिंचनाखाली येईल.
नगरसह मराठवाड्याला असा फायदा होईल
जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांत चांगले पर्जन्यमान असले, तरी त्या अगोदरचे सलग काही वर्षं जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती झाल्याने धरणांसह विहीर-बोअरच्या जलपातळीत मोठी घटली. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मिळाले तर भविष्यात कधीच चारा छावण्या, पाण्याच्या टँकरची गरज लागणार नाही. शेती सुजलाम्, सुफलाम् होईल, उद्योग वाढतील, रोजगार निर्मिती होईल.
सामूहिक रेट्याची गरज
सरकारने समुद्रात वाहून जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात तातडीने वळवावे, यासाठी नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील लाभ होणाऱ्या सर्व जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेत्यांसह सामाजिक संघटना, शेतकरी संघटनांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी सामुदायिक रेटा दिला पाहिजे.
जनतेच्या स्मरणातील विकासकाम
नेवासे-शेवगाव विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना आपण नेवासे येथील मध्यमेश्वर बंधारा, न्यायालयीन इमारत, उपकोषागार कार्यालय, औद्योगिक
प्रशिक्षण केंद्र इमारत, मुळा उजवा कालवा नूतनीकरण, आरोग्य केंद्रे इमारती, सौंदाळे येथे २२० तर भानस हिवरे येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र, भेंडे-कुकाणेसह सहा गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना उभ्या केल्या. अशीच अनेक चिरंतन ठरणारी रचनात्मक विकासकामे शेवगाव तालुक्यातही केली असून ती जनतेच्या कायम स्मरणात राहील.
हेही वाचा..
Edited By - Murlidhar Karale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.