वैजापूरला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला..

वैजापूरकरांना दिलेला शब्द पाळत अवघ्या सहा महिन्यात फडणवीस साहेबांनी वैजापूरसाठी भरघोस निधी दिला.
Bjp Vaijapur Leader Whish to Devendra Fadanvis News Aurangabad
Bjp Vaijapur Leader Whish to Devendra Fadanvis News Aurangabad
Published on
Updated on

औरंगाबाद ः राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजकारणातील एक अष्टपैलु व्यक्तीमत्व अशा शब्दांत त्यांचे वर्णन करावे लागेल. (Fadnavis kept his word to Vaijapur, Said, Bjp district Secretery Dr. Dinesh Pardeshi) एकाच नाही तर विविध विषयांचे सखोल ज्ञान, बारकावे, अभ्यास आणि त्याची तितकीच सुटसुटीत प्रभावी मांडणी हा फडणवीस यांचा गुण प्रत्येक राजकारण्याने घ्यावा असाच आहे.

२०१८ मध्ये स्वगृही परतल्यानंतर माझा आणि त्यांचा संपर्क वाढला. ते राज्याचे मुख्यमंत्री असतांना आमच्या वैजापूर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली. भाजपमध्ये प्रवेश करण्यापुर्वी त्यांची भेट झाली आणि त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला. निवडणूक प्रचाराला येत त्यांनी वैजापूरकरांना विकासाचे नवे चित्र दाखवले. (Bjp Leader of the Opposition, Devendra Fadanvis, Maharashtra)  वैजापूरची नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि तो मी व तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दणदणीत विजय मिळवत तो सार्थ ठरवला.

माझ्या पत्नी शिल्पा परदेशी या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन कामाला सुरूवात केली आणि त्याला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी भक्कम साथ दिली. नगरपरिषदेच्या माध्यमातून जोमाने काम सुरू असतांनाच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. पण वैजापूरकरांना दिलेला शब्द पाळत अवघ्या सहा महिन्यात फडणवीस साहेबांनी वैजापूरसाठी भरघोस निधी दिला.

भूमीगत गटार योजनेसाठी ४० कोटी, मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांसाठी १७ ते १८ कोटी, नागमठाण व सरला बेट येथील पुलांना मंजुरी देत त्यांनी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली. दिलेला शब्द ते कुठल्याही परिस्थितीत पुर्ण करतातच याची प्रचिती या निमिताने आली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत असतांना त्यांचा साधेपणा, जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती याचा अनुभव अनेकदा घेता आला.

एखाद्या व्यक्तीला सगळ्याच क्षेत्र आणि विभागांची इंत्यभूत माहिती कशी असू शकते याचे कधीकधी आश्चर्य वाटायचे. पण बहुदा यामुळेच त्यांचा प्रशासनावर जबर वचक राहिला आहे. अगदी आयएएस अधिकारी असो की एखाद्या ग्रामीण भागातील सजावरील तलाठी, वायरमन त्याच्याबद्दल देखील फडणवीस साहेबांची कुणी दिशाभूल करू शकत नाही, एवढी परिपुर्ण माहिती ते बाळगून असतात. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतांना त्यांनी या राज्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आणि आता विरोधी पक्षनेते म्हणून देखील ते जनतेचे प्रश्न पोटतिडकीने सभागृहात आणि रस्त्यावर उतरून मांडत आहेत.

कार्यकर्त्यांची काळजी आणि कुटुंबाप्रमाणे प्रेम ..

२०१८ च्या नगरपालिका निवडणुकीच्या आधी मी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी फडणवीस साहेबांचा आणि माझा परिचय तसा खूप जुना. साधरणतः १९९७-९८ मध्ये ते भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते, तर मी वैजापूर युवा मोर्चाचा तालुकाध्यक्ष. संघटनेत काम करत असतांनाच फडणवीस हे नागपूरचे तरुण महापौर म्हणून काम करत होते तर मी वैजापूर नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष होतो. दिल्लीत केंद्राच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांसंदर्भात एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पहिल्यांदा त्यांची भेट झाली.

तेव्हाचा साधेपणा आजही त्यांच्यात दिसून येतो. संघटनेत काम करत असतांना कार्यकर्त्यांची काळजी घेणारा, त्यांच्यावर कुटुंबाप्रमाणे प्रेम करणारा नेता, अशी देखील फडणवीसांची ख्याती आहे. नगरपालिका निवडणुक प्रचारा निमित्ताने जेव्हा ते वैजापूरला आले, तेव्हा एखाद्या कुटुंबातील व्यक्ती किंवा मोठ्या भावाने चौकशी करावी, तशी विचारपूस त्यांनी माझ्या कुटुंबाची केली. त्यामुळे त्यांच्यांशी एक कौटुंबिक नातेही निर्माण झाले.

राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडत ते भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं तळगाळात पोहचवण्याचे काम करत आहेत. समाजातील प्रत्येक घटकांना न्याय, आरोग्य, शिक्षण, सुरक्षित जीवन, निवारा आणि मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ते झटत आहेत. त्यांच्या या मिशनचा मी देखील एक भाग आहे, याचा अभिमान वाटतो. ईश्वर त्यांना चांगले दीर्घायुरारोग्य व बळ देवो,हीच सदिच्छा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com