मृत महिलेने दिली होती खोटी माहिती, तपासात पुढे आला ‘लव्ह ॲंगल’

शबानाने दिलेल्या बयानावरून पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. चौकात घटनेबाबत कोणताही सुगावा लागत नसल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तिच्या मोबाईलचा सीडीआर काढला. व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग तपासले. त्यातून शादाबचे नाव पुढे आले.
Crime
Crime

नागपूर : ४० वर्षीय महिला जळून मरण पावल्याची घटना शुक्रवारी शहरात घडली होती. वाद सोडवण्यासाठी गेली असता चौकात तरुणाने पेट्रोल टाकून जाळल्याचे तिने मृत्यूपूर्व बयानात सांगितले होते. पण पोलिस तपासात तिचे बयान खोटे ठरले असून प्रेमप्रकरणातून तरुणाने महिलेला जाळल्याचे निष्पन्न झाले आहे. बैरामजी टाऊनमध्ये राहणारा आरोपी शादाब आफदाब आलम याला पोलीसांनी अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

शबाना जावेद (४०) रा. महेंद्रनगर असे जळून मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी तिला जळालेल्या अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिने मृत्यूपूर्वी बयानात वाद सोडविण्यासाठी गेली असता सदरमध्ये भरचौकात तरूणाने पेट्रोल ओतून जाळल्याचे सांगितले होते. पोलिसांनी संबंधित चौकातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले. दुकानदार आणि लोकांची विचारपूस केली. त्यातून अशी घटनाच घडली नसल्याचे उघड झाले. पोलिसांनी तपासाची दिशा बदलताच प्रियकर शादाबने त्याच्या फ्लॅटवर तिला पेट्रोल टाकून जाळल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याला अटक केली. 
 
फेसबूकवरील मैत्रीचा भीषण अंत 
खासगी कंपनीत कामाला असणाऱ्या शबानाचे १४ वर्षापूर्वी लग्न झाले असून तिला १२ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षाचा मुलगा आहे. पतीचे आठवडी बाजारात कपड्याचे दुकान आहे. आरोपी शादाब मूळचा बिहारचा असून शिक्षणासाठी आठ -दहा वर्षापूर्वी नागपुरात आला. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर स्थानिक नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. २०१७ मध्ये शबाना व शादाबची फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर दोघांच्याही भेटीगाठीही सुरू झाल्या. राहणीमानावरून शबाना दोन मुलांची आई असल्याचा अंदाज बांधणे कठीण होते. तिनेही ही बाब लपवून ठेवली होती. 
 
वास्तविक घटनाक्रम 
शबाना विवाहित असल्याचे गतवर्षी शादाबला समजले. यातून त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला. तरीही अधूनमधून भेटीगाठी सुरूच होत्या. शादाब एक -एक पाऊल मागे घेण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या वागण्याही बदल झाला होता. शुक्रवारी तिने शादाबला फोन केला. व्हॉट्सअ‍ॅपवरही चॅटिंग सुरूच होते. दोघांमधील संबंधाचे भविष्य काय याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याच्या निर्धाराने ती शादाबच्या फ्लॅटवर गेली. दोघांमध्ये वाद झाला आणि शादाबने पेट्रोल ओतून तिला जाळले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करून तो निघून गेला. 

 
असा लागला छडा 
शबानाने दिलेल्या बयानावरून पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. चौकात घटनेबाबत कोणताही सुगावा लागत नसल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तिच्या मोबाईलचा सीडीआर काढला. व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग तपासले. त्यातून शादाबचे नाव पुढे आले. चौकशीत त्यानेच शबानाला जाळल्याची बाब पुढे आली. पोलिसांना त्याच्या फ्लॅटवरून जळालेले ब्लॅंकेट, चप्पल आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. घरच्यांची बदनामी टाळण्यासह शादाबला वाचविण्यासाठी तिने वेगळीच स्टोरी रंगविली असावी, असा कयास लावला जात आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com